आयपीएलची २१वी लढत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आज अबुधाबी येथे होणार आहे. दोन्ही संघात आतापर्यंत २० लढती झाल्या आहेत. त्यापैकी १३ चैन्नईने तर ७ कोलकाताने जिंकल्या आहेत. गुणतक्त्यात कोलकाता चार सामन्यातील दोन विजय आणि दोन पराभवासह चौथ्या स्थानावर तर चेन्नई पाच सामन्यात दोन विजय आणि ३ पराभवासह पाचव्या स्थानावर आहे. पंजाबविरुद्ध […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ट्रम्प करोनामुक्त झाले नसतील तर दुसरी प्रेसिडेन्शिअल डिबेट टाळायला हवी- जो बायडेन
ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले असले तरी ते करोनामुक्त झाल्याचं अद्याप सांगण्यात आलेलं नाही. तसेच, ट्रम्प अद्याप करोनामुक्त झाले नसतील तर दुसरी प्रेसिडेन्शिअल डिबेट टाळली पाहिजे, असं मत जो बायडेन यांनी व्यक्त केलं आहे. मंगळवारी बायडेन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “अनेक जण करोनाबाधित होत आहेत. ही एक गंभीर समस्या आहे. मला क्लेवलँड क्लिनिकच्या […]
पेणमधील मूर्तिकारही कृष्णकुंजवर; राज ठाकरेंनी दिली धोक्याची सूचना
मुंबई : बुधवारी पेणमधील मूर्तिकार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले होते. केंद्राने प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घातली असल्याने मूर्ती घडवणं कठीण जात असल्याची व्यथा त्यांनी राज ठाकरेंसमोर मांडली. बंदी उठवण्यासाठी मूर्तिकारांनी राज ठाकरेंकडे मदत मागितली आहे. राज ठाकरे म्हणाले कि प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे नदी, समुद्र यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. विसर्जनानंतर चौपाट्यांवर त्यावर असंख्य […]
रियाचा जामीन मंजूर, मुंबईबाहेर जाण्यास मनाई
मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने दिलासा देत जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र यावेळी रियाला पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला असून पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियासोबत सुशांतचे कर्मचारी सॅम्यू्ल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन […]
अजय देवगण याचा लहान भाऊ अनिल देवगन यांचं निधन
अभिनेता अजय देवगण याचा लहान भाऊ अनिल देवगन यांचे निधन झाले आहे. भावाच्या निधनाबद्दल अजय देवगणने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपले दुःख व्यक्त केले आहे. अजय देवगणने आपला चुलत भाऊ अनिल देवगण याचा फोटो शेअर करताना लिहिले की, गेल्या रात्री मी माझा भाऊ गमावला. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंब दुःखात बुडाले आहे. अजय देवगण फिल्म्स आणि […]
राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा या केवळ अफवा- महेश कोठे
सोलापूर : शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठेंनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. मी भाजपमध्ये जाणार अशा अफवा पसरवून माझं शिवसेनेचं तिकीट कट करण्याचं षडयंत्र यापूर्वी रचलं गेलं होतं. त्याच पद्धतीचे षडयंत्र आता पुन्हा माझ्याबाबतीत रचले जात आहे, असा खुलासा कोठेंनी केला. मी शिवसेनेत नाराज जरूर आहे. मात्र, राष्ट्रवादीत प्रवेश […]
पोकोने आज Poco C3 स्मार्टफोन केला भारतात लाँच
पोकोने आज आपला नवीन स्मार्टफोन Poco C3 भारतात लाँच केला आहे. पोकोचा हा फोन ३ जीबी प्लस ३२ जीबी आणि ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या ३ जीबी रॅमच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आणि ४ जीबी रॅम फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. Poco C3 ची वैशिष्ट्ये […]
या तारखे पासून सुरु होणार सिनेमा हॉल्स, चित्रपटगृहे
मुंबई : गृहमंत्रालायने अनलॉक ५ अंतर्गत गाइडलाइन्स लागू केल्या आहेत. त्यामध्ये १५ ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल्स, चित्रपटगृहे उघडण्यास संमती देण्यात आली आहे. यासंदर्भात ठाकरे सरकार गांभीर्याने विचार करत आहे. सरकार यासंबंधीच्या निर्णयासाठी सकारात्मक आहे असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. “सिनेमागृहं सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने आज निर्णय घेतला असून नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. […]
रिया आणि शौविक चक्रवर्तीला २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
ड्रग केस प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने दिले. रिया आणि शौविकच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज (६ ऑक्टोबर) संपत होती. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तपास सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने रिया आणि […]
मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी उघडले गेले फेक अकाऊंटस्; आयुक्तांनी दिला कारवाईचा इशारा
मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरूवातीला मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्या काळात सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आली होती. त्यामाध्यमातून बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं यासंदर्भात एक अहवाल तयार केला […]










