अभिनेता अजय देवगण याचा लहान भाऊ अनिल देवगन यांचे निधन झाले आहे. भावाच्या निधनाबद्दल अजय देवगणने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपले दुःख व्यक्त केले आहे.
अजय देवगणने आपला चुलत भाऊ अनिल देवगण याचा फोटो शेअर करताना लिहिले की, गेल्या रात्री मी माझा भाऊ गमावला. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंब दुःखात बुडाले आहे. अजय देवगण फिल्म्स आणि मला त्याची कमतरता नेहमी भासेल. त्यांच्या आत्माच्या शांतीसाठी प्रार्थना करा. कोरोना व्हायरस महामारीमुळे व्यक्तीगत शोकसभा आयोजित करण्यात येणार नाही.
I lost my brother Anil Devgan last night. His untimely demise has left our family heartbroken. ADFF & I will miss his presence dearly. Pray for his soul. Due to the pandemic, we will not have a personal prayer meet? pic.twitter.com/9tti0GX25S
— Ajay Devgn (@ajaydevgn) October 6, 2020




