अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये एका पित्यानेच आपल्या १० महिन्याच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुलीवर बलात्कार केल्यानंतर ती कोणतीच हालचाल करत नसल्याचे पाहून या आरोपीने गुगलवर मुलगी मेलीय की जिंवत आहे हे कसं कळेल यासंदर्भात सर्च केलं. या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणामध्ये २९ वर्षीय स्टीवन ऑस्टिन याला अटक करण्यात […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
IPL २०२० SRH vs KXIP: हैदराबादने पंजाबचा 69 रन्सने केला पराभव
IPL २०२० : सनरायजर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब या मॅचमध्ये हैदराबादने पंबाजचा ६९ रन्सने पराभव केला आहे. सनरायजर्स हैदराबादने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेली किंग्स इलेव्हन पंजाबची टीम 16.5 ओव्हर्समध्ये 132 रन्स करुन ऑल आऊट झाली. मयांक अग्रवाल हा केवळ 9 रन्स करुन रन आऊट झाला. त्यानंतर केएल राहुल हा 11 रन्स करुन आणि […]
स्मार्टफोन Samsung Galaxy F41 आज होणार लाँच
सॅमसंग आज आपला गॅलेक्सी एफ सीरीजचा पहिला स्मार्टफोन Samsung Galaxy F41 लाँच करण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनी या फोनला ६ जीबी रॅम आणि अँड्रॉयड १० ओएअस सोबत लाँच करण्यात येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी F41 आज सायंकाळी 5:30 वाजता लाँच करण्यात येणार आहे. या लाँच इव्हेंटची लाइव्ह स्ट्रिमिंग सॅमसंग इंडियाच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पाहायला मिळेल. Samsung […]
शिखर बॅंक घोटाळा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ६९ जणांना क्लीन चिट
महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेतील कथित घोटाळ्यात नाव असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. त्या अहवालात अजित पवार यांच्यासह ६९ जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे. शिखर बँकेत २५ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी […]
ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं राहत्या घरी निधन झालं आहे. आज (८ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीमध्ये देखील काम केलं. अविनाश खर्शीकर यांनी ‘बंदिवान मी या संसारी’ या […]
दाक्षिणात्य अभिनेता टोविनो थॉमस स्टंटचं शूटिंग सुरु असताना गंभीर जखमी
दाक्षिणात्य अभिनेता टोविनो थॉमस ‘काला’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाला आहे. चित्रपटातील एका स्टंटचं शूटिंग सुरु असताना त्याच्या छातीला दुखापत झाली. परिणामी अंतर्गत रक्तस्त्राव सुरु होऊन तो बेशुद्ध पडला. सध्या कोचीमधील रेनाई मेडिसीटी या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. टोविनोची प्रकृती सध्या स्थिर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. स्टंट करताना त्याच्या […]
मणिपूर नागालँडचे माजी गव्हर्नर अश्वनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व मणिपूर नागालँडचे माजी गव्हर्नर अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह शिमला येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. गेल्या काही दिवसांपासून अश्वनी कुमार हे नैराश्याच्या गर्तेत होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली. अश्वनी कुमार हे ऑगस्ट २००६ ते २००८ या कालावधीत हिमाचल […]
आज ८ ऑक्टोबर : भारतीय हवाई दलाचा वर्धापनदिन
भारतीय हवाई दलाचा वर्धापनदिन : आज ८ ऑक्टोबर, ८८ वर्षांपूर्वी १९३२ साली याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. आजच्या ८८ व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय हवाई दलाबद्दल जाणून घेऊयात. ‘नभ:स्पृशं दीप्तम्।‘ हे भारतीय हवाई दलाचे ध्येयवाक्य आहे. या वाक्याचा भाषांतर वैभवाने आकाश स्पर्श करा असे होते. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् यांनी हवाई दलाचे ध्येयवाक्य म्हणून हे […]
हाथरस घटनेतील साक्षीदारांच्या संरक्षणासंबंधीच्या उपाययोजनांची माहिती द्या- सर्वोच्च न्यायालय
हाथरस मधील घटना भयंकर असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणातील साक्षीदारांच्या सुरक्षेची उपाययोजना काय केली आहे याची माहिती 8 ऑक्टोबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला द्यावी असे निर्देश उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. हाथरसमध्ये एका दलित मुलीवर बलात्कार करून तिच्यावर निर्दयपणे अत्य़ाचार करण्य़ात आला होता. त्यातच तिचा मृत्यू झाला. सर्वोच्य न्यायालयाने याबाबत योगी आदित्यनाथ […]
या वर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील प्रभावी लस तयार होण्याची शक्यता- WHO
जगभरात सध्या सर्वजण कोरोना व्हायरसवरील प्रभावी लसीची वाट पाहत आहेत. जगभरातील अनेक देशांतील संशोधकही कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ने या वर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील प्रभावी लस तयार होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. डब्लूएचओचे अध्यक्ष टेड्रोस एडहानॉम यांनी कोरोना महामारीसंदर्भात सुरु असलेल्या एका बैठकीत बोलताना सांगितले की, आम्हाला आशा […]










