पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि उदयनराजे भोसले आमनेसामने आले असून, प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर उदयनराजे समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं होतं. प्रकाश आंबेडकर यांच्यावर सोडलेल्या टीकेला आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान उदयनराजे भोसले आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात्तील वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
काळा पैसा प्रकरण : स्विस बँकेने केंद्र सरकारला दिली भारतीय खातेदारांची दुसरी यादी
स्विस बँकेने त्यांच्या भारतीय खातेदारांची दुसरी यादी केंद्र सरकारला दिली. त्यामुळे काळा पैसा प्रकरणी भारताला मोठे यश मिळाले आहे. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात असलेल्या करारानुसार स्विस बँकेने त्यांच्याकडे असलेल्या भारतीय खातेदारांची माहिती सरकारला दिली. पहिली यादी २०१९ मध्ये आणि दुसरी यादी या वर्षी मिळाली. स्विस बँकेने खातेदाराचे त्यांच्याकडे नोंदवलेले नाव, ओळखपत्राचे पुरावे, खाते क्रमांक तसेच […]
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महिलांच्या सुरक्षेसंबंधी नवी अॅडव्हायजरी जारी
केंद्र सरकारकडून महिलांच्या सुरक्षेसंबंधी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी नवी अॅडव्हायजरी जारी केली गेली आहे. केंद्राच्या नव्या अॅडव्हायजरीत राज्यांना, महिलांसंबंधी गुन्हे प्रकरणात पोलिसांना कारवाई अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात आलेत. महिलांविरुद्धचा गुन्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या बाहेर घडला असेल तर अशा स्थितीत देखील ‘झिरो एफआयआर’ दाखल करण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. पोलीस […]
शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन
खेड : शिवसेनेचे माजी आमदार सुरेश नामदेव गोरे यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते ५६ वर्षांचे होते. १७ सप्टेंबर रोजी करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले, मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील नामांकित रुग्णालयात २२ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांचा […]
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न
लोणी : प्रवरानगर येथे पद्मभूषण डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मा. राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालकांच्या हस्ते पूजन करुन पार पडला. याप्रसंगी संचालक श्री. शांताराम जोरी, श्री. बाबू पडघरमल, संचालिका सौ. उज्वला अशोक घोलप, सौ. संगीता भास्करराव खर्डे, प्रवरा […]
नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा- राजेश टोपे
लॉकडाउननंतर अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून टप्प्याटप्प्यानं राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “पुढील काही दिवसांत राज्यात टप्प्याटप्प्यानं शाळा, धार्मिक स्थळं, व्यायामशाळा उघडण्यात येणार आहेत. तसंच नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करू. कोरोना विषाणूवर अद्यापही लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबत जगावं लागणार आहे. आपल्याला काही नियम आणि शिस्त ही […]
अंतिम वर्षातील ऑनलाईन परीक्षेदरम्यान तांत्रिक गोंधळ, परीक्षा पुढे ढकलल्या
नागपूर : मुंबई विद्यापीठातील परीक्षेत काही दिवसांपूर्वी तांत्रिक गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता नागपूर विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षेदरम्यान तांत्रिक गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. यामुळे त्या विषयाची परीक्षा नंतर घेतली जाईल, असे परिपत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. नागपूर विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा 8 ऑक्टोबरपासून सुरु झाली. काल 9 ऑक्टोबरला डिप्लोमा […]
कोरेगाव भीमा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना अटक
१ जानेवारी २०१८ रोजी पुण्याच्या कोरेगाव भीमा गावात दलित आणि मराठा समाजामध्ये हिंसाचार उफाळला होता. या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएच्या टीमनं ८३ वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांना झारखंडमध्ये नामकुम स्टेशन हद्दीत येणाऱ्या बगईंचा स्थित त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं. आज […]
मध्य रेल्वेने 8 एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय केला जाहीर
काल मध्य रेल्वेने मुंबई आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या पाच एक्सप्रेस सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला. आता त्यात वाढ करून आठ एक्सप्रेस सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, लातूर आणि नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या स्पेशल एक्सप्रेस मध्य रेल्वे सुरु करणार आहे. येत्या 11 तारखेपासून या एक्सप्रेस धावू लागतील असे मध्य रेल्वेने […]
सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जवानाचा सिक्कीममध्ये कोरोनाने मृत्यू
सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील भारतीय लष्करातील जवान अमोल किरण आदलिंगे (वय ३०) यांचा भारत-चीन सीमेवर सिक्कीममध्ये कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. आदलिंगे हे २०१२ साली हैदराबाद येथून भारत-तिबेट सीमा पोलीस दलात भरती झाले होते. सिक्कीममध्ये कर्तव्यावर रुजू असताना त्यांना करोनाचा संसर्ग झाला. त्यांच्यावर उपचार सुरू होते […]










