मुंबईमध्ये आज (सोमवार) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. बेस्टने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली असून टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास चार हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड
आरे येथील मेट्रो कारशेड कांजुरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून घेतलेला आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास चार हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी?, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. कांजुरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारने विचार केला होता. पण […]
अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल
अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. तसेच सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पात्रतेच्या निकषांमध्ये यंदा बदल करण्यात आल्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यास मदत होणार […]
IPL 2020 : मुंबईने दिल्लीवर ५ गडी राखून केली मात, मुंबई अव्वल स्थानी
IPL 2020 : गुणतालिकेतील अव्वल स्थानासाठी झालेल्या संघर्षात मुंबईकर दिल्लीच्या संघावर भारी पडले. क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव यांची अर्धशतके आणि शेवटच्या षटकांमधील पोलार्ड-कृणाल पांड्याचा संतुलित खेळ याच्या बळावर मुंबईने दिल्लीवर ५ गडी आणि २ चेंडू राखून मात केली. दिल्ली आणि मुंबई दोन्ही संघाचे ७ सामन्यांत १० गुण असले तरी मुंबई नेट रनरेटच्या बळावर ‘नंबर […]
IPL 2020 : सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स रंगली चुरशीची लढत; राजस्थानचा 5 विकेट्सनं विजय
IPL 2020 : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाली. राजस्थान रॉयल्सच्या टीमने 19.5 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 163 रन्स केल्या आणि सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवला. Match 26. It’s all over! Rajasthan Royals won by 5 wickets https://t.co/lmKmQkxZGi #SRHvRR #Dream11IPL #IPL2020 — IndianPremierLeague (@IPL) October 11, 2020 सनरायजर्स हैदराबादच्या टीमने दिलेलं […]
पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना पाहुणा जात नाही आहे. हातपाय पसरत आहे. शहरातून ग्रामीण भागात पसरतोय. परत लॉकडाऊन करावा लागेल असे आपल्याला वागायचे नाही. मानवी त्वचेवर व्हायरस 9 तास राहतो. त्यामुळं नको तिथे हात लावू नका, तोंडाला लावू नका आणि सतत हात धुवत रहा. […]
दोन विमानांची हवेतच भीषण धडक, ५ जणांचा मृत्यू
पॅरिस : फ्रान्समध्ये भीषण विमान दुर्घटनेमध्ये तब्बल ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका प्रवासी विमानाने मायक्रोलाईट विमानास धडक दिल्याने ही दुर्घटना झाली. पश्चिम फ्रान्समध्ये ही घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी ४.३०च्या सुमारास दोन विमानांमध्ये टक्कर झाली होती. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती देताना सरकारी प्रवक्त्या नादिया सेगैर म्हणाल्या […]
अनेक भारतीय दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत- राहुल गांधी
हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास केंद्रानं योगी सरकारच्या शिफारशीनंतर सीबीआयकडे दिला आहे. असं असलं तरीही, या प्रकरणावरून योगी सरकारवर होत असलेली टीका थांबलेली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश पोलिसांवर घणाघाती टीका केली आहे. देशाला हादरवून सोडणाऱ्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेवर बलात्कार झाला नसल्याचं पोलिसांनी म्हटलं […]
टेक्नोचा नवीन स्मार्टफोन Tecno Camon 16 भारतात लाँच
स्मार्टफोन मेकर कंपनी टेक्नोने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Tecno Camon 16 लाँच केला आहे. यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. तसेच या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि पंच होल डिस्प्ले दिला आहे टेक्नोच्या Tecno Camon 16 स्मार्टफोनची किंमित १० हजार ९९९ रुपये आहे. स्मार्टफोन एकाच व्हेरियंटमध्ये येतो. […]
IPL 2020 KXIP vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा किंग्स इलेव्हन पंजाबवर २ धावांनी विजय
IPL २०२० : किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅचमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव झाला. कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरने २० ओव्हरमध्ये ६ बाद १६४ धावा केल्या. त्यांनी किंग्स इलेव्हन पंजाबसमोर १६५ धावांचे आव्हान ठेवले. किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ २० ओव्हरमध्ये ५ बाद १६२ धावा करू शकला. त्यांना […]









