congress rahul gandhi
देश

अनेक भारतीय दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत- राहुल गांधी

हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास केंद्रानं योगी सरकारच्या शिफारशीनंतर सीबीआयकडे दिला आहे. असं असलं तरीही, या प्रकरणावरून योगी सरकारवर होत असलेली टीका थांबलेली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश पोलिसांवर घणाघाती टीका केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

देशाला हादरवून सोडणाऱ्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेवर बलात्कार झाला नसल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. त्यावरून उत्तर प्रदेश पोलीस व योगी सरकार वादात सापडलं होतं. याचं संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. “लज्जास्पद सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) व त्यांच्या पोलिसांचं म्हणणं आहे की, कुणीही बलात्कार केला नाही. कारण त्यांच्यासाठी आणि इतर अनेक भारतीयांसाठी ती कुणीही नव्हती,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत