२० वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेश सोडून न्यूझिलंडमध्ये स्थायिक झालेले डॉक्टर गौरव शर्मा हे आता तिथे खासदार झाले आहेत. डॉ. गौरव शर्मा हे हॅमिल्टन वेस्टमधून निवडून आले आहेत. लेबर पार्टीने त्यांना तिकिट दिलं होतं. डॉ. गौरव शर्मा यांना १५ हजार ८७३ मतं मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला ११ हजार ४८७ मतं मिळाली. गौरव शर्मा हे आपल्या कुटुंबीयांसहित […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
दिलासादायक : देशात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट
देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. तसेच कोरोनामधून बरे होणार्या रुग्णांची संख्याही सतत वाढत आहे. देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे ५५,७२२ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर देशात ५७९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आता ७ लाख ७२ हजार ५५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, […]
भारत आणि श्रीलंकेचे नौदल आजपासून सलग तीन दिवस करणार युद्धसराव
भारत आणि श्रीलंकेचे नौदल आज (१९ ऑक्टोबर) पासून सलग तीन दिवस २१ ऑक्टोबरपर्यंत युद्धसराव करणार आहे. हा सराव त्रिंकोमालीजवळ हिंद महासागरात होणार आहे. वर्षातून एकदा युद्धसराव करण्यासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात एक करार झाला आहे. या करारानुसार आठव्यांदा भारतीय नौदल आणि श्रीलंकेचे नौदल स्लिनेक्स युद्धाभ्यास करणार आहे. दोन्ही देशांचे नौदल उच्च दर्जाचा समन्वय राखण्यासाठी सराव करणार […]
चेन्नई सुपरकिंग्स संघाला धक्का, ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे खेळू शकणार नाही पुढील काही मॅच
चेन्नई सुपरकिंग्स संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याला दुखापत झाली आहे. त्यामुळे आयपीएलच्या पुढील मॅच ब्राव्हो खेळणार नाही, अशी शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये ब्राव्होच्या कंबरेजवळच्या पायाला नियंत्रित करणाऱ्या स्नायूंना दुखापत झाली. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. दुखापतीचे स्वरुप लक्षात येताच ब्राव्होला विश्रांती घेऊन उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. ब्राव्होला स्नायूंच्या दुखापतीमुळे खेळण्यासाठी वेगाने पायाच्या हालचाली […]
Google ने बंद Trusted Contacts अॅप
Google ने आपले Trusted Contacts अॅप बंद केले आहे. गुगलचे हे अॅप प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले आहे. कंपनीने सांगितले की, १ डिसेंबर २०२० पासून याचा सपोर्ट बंद केला जाणार आहे. गुगलने ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स अॅपला गुगल लॅटिट्यूड आणि गुगल प्लस लोकेशन शेयरिंग करणे बंद केले होते. गुगलने ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स अॅप २०१६ मध्ये लाँच […]
अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाला NCB ने केली अटक
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगलची चौकशी करणार्या नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोच्या पथकाने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएडसचा भाऊ अॅगिसिओस डेमेट्रिएडस याला अटक केली आहे. त्याच्याकडून एनसीबीने हशीष आणि अल्प्रझोलमच्या गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत. अमली पदार्थांच्या प्रकरणात ड्रग्ज पेडलर्सच्या अटकेमुळे अॅगिसिओलोसची ड्रग्स डीलिंगमधली भूमिका समोर आली आहे. एनसीबीने सांगितले कि, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या […]
मी अमित शहांना ओळखतो, ते सत्य भूमिका मांडतात- संजय राऊत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी, राज्यपाल पत्राबाबत अमित शहांची भूमिका योग्यच आहे. ते सत्य भूमिका मांडतात, असे म्हटलं आहे. महाराष्ट्रात मंदिरे उघडण्याच्या मुद्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्या […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती थोडी खालावली असल्याने केवळ खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. तर, घाबरण्याचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अमित ठाकरे यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आहे. शिवाय, मलेरिया टेस्ट देखील निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. एक-दोन दिवसात त्यांना […]
नुकसानभरपाई देण्यासाठी शासन खंबीर आहे- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सकाळी पोहोचले. सांगवी येथील नुकसानीची पाहणी करून गावक-यांना दिलासा दिला. बोरी नदीकाठी असलेल्या सांगवी खुर्द व सांगवी बुद्रूक या दोन्ही गावांना जोडणा-या पुलावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. जेथून मुख्यमंत्री दोन्ही गावांच्या […]
IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्सचा सुपर ओव्हरमध्ये विजय
IPL 2020 : सनराजयर्स हैदराबादने अबुधाबीत सुरू असलेल्या आयपीएलच्या ३५व्या लीग मॅचमध्ये टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने २० ओव्हरमध्ये ५ बाद १६३ धावा केल्या आणि सनराजयर्स हैदराबाद समोर २० ओव्हरमध्ये १६४ धावा करण्याचे आव्हान ठेवले. कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. शुभम गिलने ३७ चेंडूत ५ चौकार मारत […]










