Rapid Corona Test
इतर कोरोना

5 मिनिटात रिपोर्ट देणारी रॅपिड कोरोना टेस्ट विकसित – ऑक्सफोर्डच्या संशोधकांचा दावा

ब्रिटिश शास्त्रज्ञांनी 5 मिनिटात रिपोर्ट देणारी रॅपिड कोरोना व्हायरस टेस्ट विकसित केली आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या रॅपि़ड अँटिजन टेस्टपेक्षा ही तीनपट वेगवान आहे. ऑक्सफोर्डच्या टीमला आशा आहे की पुढील वर्षाच्या सुरूवातीला डिवाइसची तयारी सुरु करण्यात येईल. त्यानंतर मंजूर केलेले डिवाइस सहा महिन्यांनंतर उपलब्ध होईल. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर अखिलस कापानडिज यांनी सांगितलं की, […]

Ajit Pawar
महाराष्ट्र

पूरस्थितीसाठी कारणीभूत ठरलेले अतिक्रमण काढण्याचे अजित पवारांचे आदेश

पुण्यात झालेल्या अतिवृष्टीने इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये महापूर सदृश्य परिस्थिती तयार झाली होती. यामुळे शेतीसह राहत्या घरांचे व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकांच्या घरात पाणी घुसले. गावात पाणी शिरल्याचे मुख्य कारण गावातील ओढ्या नाल्यात झालेले अतिक्रमण असल्याचे लक्षात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी […]

Ravi Shankar Prasad
देश राजकारण

केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद थोडक्यात वाचले; त्याच्या हेलिकॉप्टरला अपघात

पाटणा : केंद्रीय विधी व न्याय खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथे विमानतळावर घडली. उतरत असताना पाटणा विमानतळावर तारेच्या कुंपणाला हेलिकॉप्टरच्या पंख्याचा स्पर्श झाला. यामुळे हेलिकॉप्टरच्या पंख्याचे पाते तुटले. या अपघातातून रविशंकर प्रसाद थोडक्यात वाचले, ते सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टरमध्ये बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय आणि संजय झा होते. […]

gym
महाराष्ट्र

अखेर जिम, व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी मान्य

मुंबई : राज्य सरकारने अखेर जिम, व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी मान्य केली आहे. येत्या दसऱ्यापासून राज्यात जिम, व्यायामशाळा सुरु होणार आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपायोजना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, राज्यात जिम, फिटनेस सेंटर, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. परवानगी देत असतानाच एसओपीचे काटेकोरपण पालन करण्याचे उद्धव […]

Royal Challengers Bangalore
क्रीडा

RCB रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ विकेट राखून विजय

IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्स विरुद्धची मॅच ७ विकेट राखून जिंकली. राजस्थान रॉयल्सने दिलेले १७८ धावांचे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ विकेट गमावून १९.४ ओव्हरमध्ये पूर्ण केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एबी डीविलिअर्सने २२ चेंडूत एक चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ५५ धावा केल्या. सलामीवीरी देवदत्त पडिक्कलने ३५ आणि अॅरॉन फिंचने १४ […]

Devendra Fadnavis's
देश महाराष्ट्र राजकारण

अतिवृष्टी भागात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा तीन दिवस दौरा

मुंबई : महाराष्ट्रात पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात  पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. १९ ऑक्टोबर पासून दौऱ्याला सुरुवात होईल. आपल्या दौऱ्याची सुरुवात देवेंद्र […]

Indian women's cricket team star bowler Mansi Joshi
क्रीडा

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज मानसी जोशीला कोरोनाची लागण

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज मानसी जोशीला कोरोनाची लागण झाली आहे. कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मानसी आता दुबईत खेळवण्यात येणाऱ्या महिला टी20 चॅलेंजमध्ये सहभागी होणार नाही. 27 वर्षीय मानसी जोशीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे ती सध्या देहराडूनमध्ये क्वॉरंटाईन आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील इतर खेळाडू 13 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, […]

kangana ranaut
मुंबई

कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचे मुंबई पोलिसांना कोर्टाकडून आदेश

वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना अभिनेत्री कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगनासोबत तिची बहीण रंगोलीविरोधातही एफआयआर दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे. कंगना आणि रंगोली ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप आहे. वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात […]

prakash ambedkar
महाराष्ट्र

महाराष्ट्रात वादळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दौरा करावा- प्रकाश आंबेडकर

परतीच्या कोसळलेल्या पावसानं कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही होत आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष दौरा करण्याची मागणी केली आहे, त्याबरोबरच व्हिडिओही त्यांनी ट्विट केला आहे. […]

Amazon great indian festival sale
तंत्रज्ञान

अॅमेझॉन वर जबदरदस्त ऑफर्स, १० हजारांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन्स

अॅमेझॉन वर जबदरदस्त ऑफर्स असलेला ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये केवळ फ्लॅगशीप आणि प्रीमियम डिव्हाइसेजवर ऑफर मिळत नाही तर बजेट सेगमेंटमध्येही खूप ऑप्शन आहेत. १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत Redmi 9A पासून Samsung M01 Core पर्यंत डिव्हाईसेज खरेदी करता येवू शकतात. HDFC डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास १० टक्के कॅशबॅक […]