Sharad Pawar to visit Marathwada
महाराष्ट्र

पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसामुळे पिकांचं मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालं, त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. या पार्श्ववभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उद्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. शरद पवार दोन दिवसांच्या मराठवाड्याचा दौऱ्यावर असणार आहेत. तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे शरद पवार भेट देणार असून पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार […]

Mumbai Local will start for women
मुंबई

मुंबई लोकल १७ ऑक्टोबर पासून महिलांसाठी होणार सुरु

मुंबई लोकल महिलांसाठी सुरु होणार आहेत. १७ ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सर्व महिलांना लोकल प्रवास करता येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते लोकल सेवा सुरु असेपर्यंत सर्व महिला प्रवास करु शकणार आहेत. मुंबई आणि MMR मधील महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी Q R कोडची गरज असणार […]

Congress leader Ghulam Nabi Azad
देश

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना करोनाची लागण

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी होम क्वारंटाइन आहे. मागील काही दिवसांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी त्यांची करोना चाचणी करावी. तसेच सरकारी नियमांचे पालन करावे” असं आवाहनही त्यांनी केलं आहे. I have tested […]

honda amaze special edition
तंत्रज्ञान

होंडा Amaze या कारचं स्पेशल व्हर्जन लाँच

होंडा कार्स इंडियाने सणासुदीच्या दिवसात आपल्या कॉम्पॅक्ट सेडान Amaze या कारचं स्पेशल व्हर्जन लाँच केलं आहे. या स्पेशल व्हर्जनमध्ये डिजीपॅड २.० असेल. ही एक १७.७ सेमी टचस्क्रीन प्रगत अॅडव्हान्स डिस्प्ले ऑडिओ सिस्टम आहे. Honda Amaze च्या पेट्रोल वेरिएंटमध्ये कंपनीने 1.2 लीटरची क्षमतेचे नॅचरल एस्पायर्ड इंजिनचा उपयोग केला आहे. दुसरीकडे डीजल वेरिएंटमध्ये कंपनीने 1.5 लीटरच्या क्षमतेच्या […]

Famous costume designer Bhanu Athayya
मनोरंजन

भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या यांचं निधन

प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या यांचे निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. भानू अथय्या या ९१ वर्षांच्या होत्या. भानू अथय्या यांनी भारताला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला होता. भानू अथय्या यांचे पूर्ण नाव भानुमती अण्णासाहेब राजोपाध्याय होते. त्यांचा जन्म २८ एप्रिल १९२९ रोजी कोल्हापुरात झाला होता. त्यांनी १९५६ साली सुपरहिट सिनेमा सीआयडी साठी […]

Four small siblings were brutally killed
महाराष्ट्र

चार चिमुकल्या भावंडांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या

जळगाव : रावेर तालुक्यात बोरखेडा शिवारातील एका शेतात असलेल्या घरात अज्ञातांनी चार चिमुकल्या भावंडांची निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटनेमुळे अवघा जळगाव जिल्हा हादरला. ही खळबळजनक घटना आज (शुक्रवारी) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरापासून काही अंतरावर बोरगाव शिवारात शेख मुश्ताक यांचे शेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेख यांच्या शेतात मयताब भिलाला […]

chief minister uddhav thackeray
महाराष्ट्र

अन्यथा लोकांचा “ठाकरे” नावावरील विश्वास उडेल- मनसे प्रवक्ते बाळा नांदगावकर

अतिवृष्टीमुळे सांगली, सोलापुरातील खरीप पिके, भाजीपाल्यासह कोकणातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. अतिवृष्टीचा कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी घराबाहेर पडावे असे म्हटले आहे. मनसेचे प्रवक्ते आणि नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विटरवरुन याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

In Uttar Pradesh a BJP worker shot dead a man
देश

उत्तर प्रदेशात भाजपा कार्यकर्त्याने एका व्यक्तीची गोळ्या घालून केली हत्या

उत्तर प्रदेशात एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन दुकांनांसंबंधी बैठक सुरु असताना वाद निर्माण झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडला. रेशन दुकानांच्या वाटपासाठी बैठक बोलावण्यात आली होती. पण सदस्यांमधील वादामुळे अधिकाऱ्यांनी बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचवेळी वाद निर्माण होऊन गोळीबार करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी […]

North Konkan including Mumbai and Thane heavy rains, red alert issued
महाराष्ट्र

आज मध्य महाराष्ट्र व कोकण विभागात जोरदार पावसाची शक्यता

आज (१६ ऑक्टोबर) कोकण विभागात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १६ ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जिल्ह्यंमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. बुधवारी पावसाने […]

Punjab beat Bangalore
क्रीडा

IPL 2020 : पंजाबने बेंगळुरू वर ८ गडी राखून केली मात

आयपीएल मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आपली पराभवांची मालिका खंडीत करण्यात यशस्वी ठरला आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल, कर्णधार लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने RCB वर ८ गडी राखून मात केली आहे. तेराव्या हंगामात आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या गेलने अर्धशतक झळकावलं. कर्णधार लोकेश राहुलनेही नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा […]