होंडा कार्स इंडियाने सणासुदीच्या दिवसात आपल्या कॉम्पॅक्ट सेडान Amaze या कारचं स्पेशल व्हर्जन लाँच केलं आहे. या स्पेशल व्हर्जनमध्ये डिजीपॅड २.० असेल. ही एक १७.७ सेमी टचस्क्रीन प्रगत अॅडव्हान्स डिस्प्ले ऑडिओ सिस्टम आहे.
Honda Amaze च्या पेट्रोल वेरिएंटमध्ये कंपनीने 1.2 लीटरची क्षमतेचे नॅचरल एस्पायर्ड इंजिनचा उपयोग केला आहे. दुसरीकडे डीजल वेरिएंटमध्ये कंपनीने 1.5 लीटरच्या क्षमतेच्या इंजिनचा उपयोग केला आहे. पेट्रोल इंजिन 90hpची पावर आणि 110Nmचा टॉर्क जेनरेट करतो. याच प्रमाणे डीजल इंजिन बाबत बोलायचे तर 100hpची पावर आणि 200Nmचा टॉर्क जेनरेट करतो.
Honda Amaze मध्ये एलईडी पोजिशन लँप, फ्रंट फॉग लँप, रियर कॉम्बिनेशन लँप, एलईडी टर्न इंडिकेटर्स सह पावर-फोल्डिंग ओआरवीएम, अलॉय व्हील आणि शार्क फिन एंटिना सारखे फीचर्स आहेत. कॉम्पॅक्ट सेडानमध्ये 7 इंचचे डिजीपॅड टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, मल्टीफंक्शन स्टीयरिंग व्हील, स्वयंचलित एसी आणि इंजन स्टार्ट / स्टॉप बटन सारख्या अनेक सुविधा मिळतात. यात नवीन सीट कव्हर्ससुद्धा असतील. या शिवाय Amaze BS-6 मध्ये पहिल्याप्रमाणे ड्यूल एयरबॅग, एबीएस, रियर पार्किंग सेंसर आणि ईबीडी उपलब्ध आहे.
दिल्लीच्या शोरूममध्ये त्याची किंमत ७ लाख ते ९.१० लाख रुपये आहे. या मॉडेलचे मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ७ लाख रुपये आहे. सीव्हीटी व्हेरिएंटची किंमत ७.९० लाख रुपये आहे. त्याच वेळी, डिझेल मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत ८.३ लाख रुपये आहे आणि सीव्हीटी (व्हेरिएबल ट्रान्समिशन) ची किंमत ९.१० लाख रुपये आहे.




