Rapid Corona Test

5 मिनिटात रिपोर्ट देणारी रॅपिड कोरोना टेस्ट विकसित – ऑक्सफोर्डच्या संशोधकांचा दावा

इतर कोरोना

ब्रिटिश शास्त्रज्ञांनी 5 मिनिटात रिपोर्ट देणारी रॅपिड कोरोना व्हायरस टेस्ट विकसित केली आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या रॅपि़ड अँटिजन टेस्टपेक्षा ही तीनपट वेगवान आहे. ऑक्सफोर्डच्या टीमला आशा आहे की पुढील वर्षाच्या सुरूवातीला डिवाइसची तयारी सुरु करण्यात येईल. त्यानंतर मंजूर केलेले डिवाइस सहा महिन्यांनंतर उपलब्ध होईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर अखिलस कापानडिज यांनी सांगितलं की, “आमची पद्धत कोरोना व्हायरसचा अंश तात्काळ पकडण्याचा आहे. इतर तंत्रांमध्ये अँटी बॉडी रिस्पॉन्सचा उशीरा शोध लागतो. हे महाग असून सँपल घेण्यासही बराच वेळ लागतो. हे टेस्ट किट सोपं, वेगवान आणि कमी किमतीचं असणार आहे.

संशोधकांनी जारी केलेल्या केलेल्या प्री-प्रिंट रिसर्चच्या परिणामात असा दावा आहे की, नॅजल स्वॅबच्या मदतीने किट कोरोना व्हायरसच्या पृष्ठभागावर असलेले प्रोटिन किंवा अँटी बॉडी स्कॅन करु शकते. अँटिजन टेस्ट PCR विश्वासार्ह नसतात, की जे कोरोना व्हायरसचे अत्यंत सूक्ष्म कण कॅप्चर करू शकतील. परंतु समर्थकांचा असा दावा आहे की रॅपिड टेस्ट परिवर्तनकारक असेल कारण ती विमानतळ आणि कार्यालयात नेली जाऊ शकते आणि इतरांना संसर्ग होण्याचा धोका पटकन ओळखता येईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत