PM narendra modi
कोरोना देश राजकारण

लॉकडाऊन संपला तरी कोरोनाचं संकट कायम, देशवासियांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन – पंतप्रधान मोदी

दिल्ली : करोनाची लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची पूर्ण तयारी सुरु आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहचावी यासाठी सरकारची तयारी झाली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. करोनाविरोधातली लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोणीही निष्काळजीपणा केला तर त्यामुळे आपल्या आनंदावर विरजण पडू शकतं. सावधगिरी बाळगून सगळे व्यवहार करा असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

करोनाच्या संकटाशी आपण चांगली लढाई दिली आहे. सणवारांचे दिवस आहेत, बाजारात काहीशी चमक दिसू लागली आहे. मात्र लॉकडाउन संपला असला तरीही व्हायरस गेलेला नाही हे विसरु नका. भारताने आपली स्थिती सावरली आहे ती आपल्याला आणखी उंचवायची आहे. आता हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. आपल्यापेक्षा अमेरिका आणि ब्राझिल यांची स्थिती वाईट आहे. हळूहळू सगळेच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  1. लॉकडाऊन संपला तरी कोरोनाचं संकट कायम, देशवासियांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन
  2. मानवतेला वाचवण्यासाठी संपूर्ण जगभर काम केलं जात आहे.
  3. कोरोनाचे औषध वा लस मिळेपर्यंत ढिलाई दाखवू नका.
  4. सणासुदीच्या काळात हलगर्जीपणा करु नका, वेळोवेळी हात धुवा, मास्क लावा.
  5. कोरोना काळात जनतेनं सहकार्य केलं, आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
  6. कोरोनाची लस येईपर्यंत काळजी घेतली पाहिजे, निष्काळजीपणा केल्यास कोरोनाचे रुग्ण वाढतील.
  7. देशात ७ लाख ४९ हजार ९७३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण.
  8. भारताचा कोरोना रिकव्हरी रेट ८८.६ टक्के.
  9. देशात करोना रुग्णांनासाठी ९० लाखांपेक्षा जास्त बेड्स उपलब्ध
  10. १२ हजार क्वारंटाइन सेंटर्स
  11. देशातल्या चाचण्यांची संख्या १० कोटींचा टप्पा ओलांडेल
  12. करोनाविरोधात लढताना जास्तीत जास्त चाचण्या करणं ही आपली ताकद
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत