IPL २०२० : राजस्थान (RR) विरूद्धच्या सामन्यात चेन्नईला (CSK) मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं, या पराभवानंतर (Suresh Raina) सुरेश रैनाने पुनरागमन करावं अशी जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. रैनाने या स्पर्धेतून घेतलेल्या माघारीमुळे CSKला फटका बसला, पण रैनाचा हा निर्णय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मात्र पथ्यावर पडला.
राजस्थानविरूद्धचा सामना हा धोनीचा २००वा IPL सामना होता. असा पराक्रम करणारा धोनी पहिला खेळाडू ठरला. स्पर्धा सुरू झाली तेव्हा धोनीने १९० सामने खेळले होते, तर सुरेश रैना १९३ सामन्यांसह आघाडीवर होता. जर रैनाने स्पर्धेतून माघार घेतली नसती तर IPLमध्ये २०० सामने खेळणारा पहिला खेळाडू बनण्याचा मान सुरेश रैनाला मिळाला असता. या आधी ५०वा, १००वा आणि १५०वा IPL खेळणारा पहिला खेळाडू बनण्याचा मानही रैनालाच मिळाला होता, पण स्पर्धेतून माघार घेतल्याने रैनाचा २०० सामन्यांचा मान हुकला.
The first ever player to play his 200th match in IPL, Best of luck for today @msdhoni Bhai .. Wishing you loads of success. You always make us proud ?. #yellove?#chennaisuperkings #whistlepodu pic.twitter.com/ORm8jP9X53
— Suresh Raina?? (@ImRaina) October 19, 2020
राजस्थान विरूद्ध चेन्नई सामन्याआधी सुरेश रैनाने धोनीसोबतचा एक फोटो पोस्ट केला. राजस्थानविरूद्धचा हा सामना महेंद्रसिंग धोनीचा IPL स्पर्धेतील २००वा सामना ठरला. IPL स्पर्धेत २०० सामने खेळण्याचा इतिहास धोनीने रचला. हेच औचित्य साधून रैनाने फोटो पोस्ट केला. “IPL स्पर्धेत २०० सामने खेळणारा पहिलावहिला खेळाडू… महेंद्रसिंग धोनी. आजच्या सामन्यासाठी तुला शुभेच्छा. भाई, असाच यशस्वी होत राहा. तुझा आम्हाला कायम अभिमान असेल”, असं ट्विट रैनाने केलं.




