IPL २०२१ : आयपीएल मध्ये एखाद्या खेळाडूने शतक केले कि सामना जिंकणेही सोपे जाते. आयपीएल मध्ये एकाच खेळाडूचे शतक झालेले जास्त सामने नाहीत. इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वाधिक वैयक्तिक धावा केलेल्या १० फलंदाजांची यादी आपण पाहणार आहोत. (top 10 highest individual scores in IPL history)
बऱ्याच चाहत्यांना आयपीएल इतिहासातील सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणाऱ्या खेळाडूबद्दल माहीत नाही. चला तर मग जाणून घेऊया आयपीएल इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणाऱ्या 10 खेळाडूंबद्दल…
- ख्रिस गेल (Chris Gayle) : 175 * – 2013
आयपीएल इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकावर आहे वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle). गेलने २०१३ साली बेंगळुरू येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना पुणे वॉरिअर्सविरुद्ध अवघ्या ६६ चेंडूत १३ चौकार आणि १७ षटकारांच्या मदतीने तब्बल १७५ धावांची नाबाद खेळी केली होती. या सामन्यात गेलचा स्ट्राईक रेट २६५.१५ होता. गेलचा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम आतापर्यंत कोणालाही मोडता आलेला नाही. - ब्रेंडन मॅक्यूलम (Brendon McCullum) : 158 * – २००८
न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज ब्रेंडन मॅक्यूलम (Brendon McCullum). २००८ साली आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मॅक्यूलमने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध त्याने केवळ ७३ चेंडूत १५८ धावांची नाबाद खेळी केली होती. या सामन्यात त्याने १० चौकार आणि १३ षटकारांच्या जोरावर १५८ धावा केल्या. या सामन्यात मॅक्यूलमला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित केले होते. - एबी डिविलियर्स (AB De Villiers) : 133 * – 2015
एबी डिविलियर्स (AB De Villiers) याने २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध ५९ चेंडूत १३३ धावांची नाबाद वैयक्तिक खेळी केली होती. या सामन्यात त्याने १९ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर १३३ धावा केल्या होत्या. - केएल राहुल (KL Rahul) : 132 * – 2020
केएल राहुलने (KL Rahul) आरसीबीविरूद्ध केवळ 69 चेंडूत नाबाद 132 धावा केल्या. या सामन्यात राहुलने 14 चौकार आणि 7 षटकार मारून १३२ धावा पूर्ण केल्या होत्या. नव्या पिढीतील सर्वाधिक रन असणार्या फलंदाजांपैकी राहुल एक आहे. - एबी डिविलियर्स (AB De Villiers) : 129 * – 2016
या यादीत पुन्हा एकदा एबी डिविलियर्सचे नाव आहे. त्याने २०१६ मध्ये विराट कोहलीसोबत (Virat Kohli) भागीदारी करत आपल्या मागील भागीदारीचा विक्रम मोडला. या दोघांनीही गुजरात लायन्स संघाविरुद्ध आयपीएल इतिहासातील २२९ धावांची सर्वोच्च भागीदारी रचली. यादरम्यान डिविलियर्सने केवळ ५२ चेंडूत १० चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीने १२९ नाबाद धावा केल्या. याव्यतिरिक्त विराटनेही १०९ धावांची खेळी केली होती. - ख्रिस गेल (Chris Gayle) : 128 * – 2012
या यादीत पुन्हा एकदा ख्रिस गेल चा समावेश आहे. T20 क्रिकेट मधील विस्फोटक फलंदाज म्हणून ख्रिस गेलला ओळखले जाते. तो एकाच जागेवर उभे राहून चेंडू बाऊंड्रीलाईनच्या पलीकडे पाठविण्यात चांगलाच माहीर आहे. आयपीएल इतिहासात सर्वोधिक वैयक्तिक खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये गेल चा समावेश आहे. २०१२ साली दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध खेळताना त्याने ६२ चेंडूंच्या मदतीने तब्बल १२८ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यात ७ चौकार आणि १३ षटकारांचा समावेश आहे. - ऋषभ पंत (Rishabh Pant) : 128 * – 2018
ऋषभ पंतने (Rishabh Pant) आयपीएलमध्ये पहिले शतक सनरायझर्स हैदराबादविरुद्ध केले. त्याने 63 चेंडूंत नाबाद १२8 धावा केल्या. त्यात त्याच्या १५ चौकार आणि ७ सिक्स चा समावेश आहे. - मुरली विजय (Murali Vijay ) : १२७ – 2010
राजस्थान रॉयल्सविरूद्ध सीएसकेचा सलामीवीर मुरली विजयने केवळ 56 चेंडूत 127 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता. - डेव्हिड वॉर्नर (David Warner) : 126 – 2017
सनरायझर्स हैदराबादसाठी वॉर्नरने केवळ ५९ चेंडूंत १२६ धावा केल्या होती. त्यात त्याच्या 10 चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे. - विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) : 122 – 2014
विरेंद्र सेहवागने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात 58 चेंडूत 122 धावा केल्या होत्या. त्यात 12 चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता.




