Kolkata Knight Riders

IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्सचा सुपर ओव्हरमध्ये विजय

इतर क्रीडा

IPL 2020 : सनराजयर्स हैदराबादने अबुधाबीत सुरू असलेल्या आयपीएलच्या ३५व्या लीग मॅचमध्ये टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने २० ओव्हरमध्ये ५ बाद १६३ धावा केल्या आणि सनराजयर्स हैदराबाद समोर २० ओव्हरमध्ये १६४ धावा करण्याचे आव्हान ठेवले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. शुभम गिलने ३७ चेंडूत ५ चौकार मारत ३६ धावा केल्या तर राहुल त्रिपाठीने १६ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार मारुन २३ धावा केल्या. त्रिपाठीला टी नटराजनने क्लीनबोल्ड केले तर राशिद खानच्या चेंडूवर प्रियम गर्गकडे झेल देऊन शुभम गिल परतला. नितिश राणाने २० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार मारुन २९ धावा केल्या. तो विजय शंकरच्या चेंडूवर प्रियम गर्गकडे झेल देऊन परतला. अँड्रे रसेल ११ चेंडूत १ चौकार मारुन ९ धावा केल्यानंतर बाद झाला. टी नटराजनच्या चेंडूवर विजय शंकरने त्याचा झेल घेतला. इओइन मॉर्गनने २३ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार मारुन ३४ धावा केल्या. बसिल थम्पीच्या चेंडूवर मनिष पांड्येने त्याचा झेल घेतला. दिनेश कार्तिक १४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर २९ धावा करुन नाबाद राहिला.

टी नटराजनने ४ ओव्हरमध्ये ४० धावा देऊन २ विकेट घेतल्या. विजय शंकरने ४ ओव्हरमध्ये २० धावा देऊन एक विकेट घेतली. राशिद खानने ४ ओव्हरमध्ये २८ धावा देऊन एक विकेट घेतली. बसिल थम्पीने ४ ओव्हरमध्ये ४६ धावा देत १ विकेट घेतली. संदीप शर्माने ४ ओव्हरमध्ये २७ धावा दिल्या. टी नटराजन आणि बसिल थम्पीच्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा काढण्यात कोलकाता नाईट रायडर्सचे फलंदाज यशस्वी झाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत