Arjun Rampal's girlfriend's brother arrested
मनोरंजन

अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाला NCB ने केली अटक

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगलची चौकशी करणार्‍या नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोच्या पथकाने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएडसचा भाऊ अ‍ॅगिसिओस डेमेट्रिएडस याला अटक केली आहे. त्याच्याकडून एनसीबीने हशीष आणि अल्प्रझोलमच्या गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अमली पदार्थांच्या प्रकरणात ड्रग्ज पेडलर्सच्या अटकेमुळे अ‍ॅगिसिओलोसची ड्रग्स डीलिंगमधली भूमिका समोर आली आहे. एनसीबीने सांगितले कि, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अनेक ड्रग पेडलर्सशी अ‍ॅगिसिलोसचा संपर्क होता. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ईटाइम्सला सांगितलं की, ‘आरोपी हा सुशांत-रिया प्रकरणातील ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात होता. आरोपीचा या खटल्याशी थेट संबंध आहे आणि म्हणूनच त्याला अटक करण्यात आली आहे.’ एनसीबीला त्याची दोन दिवसांची कोठडी मिळाली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत