राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी, राज्यपाल पत्राबाबत अमित शहांची भूमिका योग्यच आहे. ते सत्य भूमिका मांडतात, असे म्हटलं आहे.
महाराष्ट्रात मंदिरे उघडण्याच्या मुद्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रातून ‘तुम्ही कधीपासून सेक्युलर झालात’, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला होता. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त करताना राज्यपालांनी ‘ते शब्द टाळायला पाहिजे होते’, असे म्हटले आहे. शहा यांच्या या भूमिकेचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले आहे. राज्यपाल पत्राबाबत अमित शहांची भूमिका योग्यच आहे, आम्ही या वादावर आता पडदा टाकला आहे. अमित शहांचे वक्तव्य राजकीय अर्थाने नाही आहे. मी त्यांना ओळखतो ते सत्य भूमिका मांडतात, असं संजय राऊत म्हणाले.




