Trusted Contacts app

Google ने बंद Trusted Contacts अॅप

तंत्रज्ञान

Google ने आपले Trusted Contacts अॅप बंद केले आहे. गुगलचे हे अॅप प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले आहे. कंपनीने सांगितले की, १ डिसेंबर २०२० पासून याचा सपोर्ट बंद केला जाणार आहे. गुगलने ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स अॅपला गुगल लॅटिट्यूड आणि गुगल प्लस लोकेशन शेयरिंग करणे बंद केले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गुगलने ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स अॅप २०१६ मध्ये लाँच केले होते. याद्वारे युजर आपल्या फेवरिट कॉन्टॅक्टसोबत डिव्हाईस अॅक्टिविटी स्टेट्स आणि लोकेशन शेयर करू शकत होते. ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्सचा वापर करणाऱ्या युजर्संना गुगलने याबाबतची माहिती ईमेल करून दिली आहे. यात सांगितले की, लोकेशन शेयरिंगला आता गुगल मॅप्ससोबत जोडले आहे. त्यामुळे आता ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्सची गरज नाही. प्ले स्टोरवरून हे अॅप आता डाऊनलोड करता येणार नाही. गुगलने स्पष्ट सांगितले की, हे अॅप १ डिसेंबर २०२० पर्यंत युजर वापरू शकतात. त्यानंतर ते आपोआप बंद होईल. तसेच प्ले स्टोरवरून हे अॅप आता डाऊनलोड करता येणार नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत