जर तुम्ही मोबाईलवरून पैशांचे व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सायबर सिक्युरिटी रिसर्चरने एक नवीन अँड्रॉइड ट्रोजन ओळखला आहे. हा एक प्रकारचा धोकादायक मालवेअर आहे, जो तुमचे बँकखाते रिकामे करू शकतो. हे नवीन ट्रोजन फोन अॅपच्या मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन सिस्टमला तोडण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या नवीन मालवेअरला SharkBot असे नाव देण्यात आले आहे.
SharkBot अँड्रॉइड मालवेअर युरोप आणि यूएस सारख्या देशांमध्ये ओळखले गेले आहे. तसेच भारत देखील त्याच्या कचाट्यात येऊ शकतो. हा मालवेअर गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या मोबाइल फोनवर हल्ला करण्यासाठी जबाबदार आहे. SharkBot चा उद्देश ऑटोमॅटिक ट्रान्सफर सिस्टम (ATS) द्वारे पैसे हस्तांतरित करणे हा आहे. ATS (ऑटोमॅटिक ट्रान्सफर सिस्टम) एक प्रगत आक्रमण तंत्र आहे. जे ऑटोमॅटिक पद्धतीने पैसे चोरी करण्यास जबाबदार आहे.
अँटी व्हायरसला चकवा देण्यात सक्षम :
अहवालात दावा करण्यात आला आहे की SharkBot मालवेअर अँटी व्हायरसला चकवा देण्यात सक्षम होऊ शकतो. एकदा SharkBot फोनवर इन्स्टॉल झाल्यानंतर, तो लोकांच्या वैयक्तिक बँकिंग माहिती (पर्सनल बैंकिंग इंन्फॉर्मेशन) जसे की बँक बॅलन्स इत्यादी माहिती मिळवू शकतो.
sharkBot ची ओळख नवीन पिढीतील मोबाइल मालवेअर म्हणून झाली आहे. जो मालवेअर अटॅकने संक्रमित डिव्हाइसमध्ये एटीएस हल्ल्यासाठी जबाबदार असू शकतो. अशा प्रकारचे तंत्र इतर मोबाइल ट्रोजन बँकिंग ऍप्समध्ये दिसून आले आहे. यामध्ये Gustuff चे नाव प्रामुख्याने समोर येते. अहवालानुसार, मालशियस अॅप साइड लोडिंग तंत्र आणि सोशल इंजिनिअरिंग स्कीमद्वारे वापरकर्त्याच्या डिव्हाइसमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी जबाबदार आहे.




