‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेंतर्गत भारतीय लष्कराने एक नवीन मेसेजिंग अॅप डेव्हलप केलं आहे. इंडियन आर्मीकडून लाँच करण्यात आलेल्या या मेसेजिंग अॅप ला ‘Secure Application for the Internet (SAI)’ नाव दिले आहे. हे अॅप इंटरनेट द्वारे अँड्रॉयड प्लॅटफॉर्मवर अँड टू अँड सिक्योर व्हाईस, टेक्स्ट आणि व्हिडिओ कॉलिंग सर्विस सपोर्ट करते. गुरुवारी संरक्षण मंत्रालयाने याची माहिती दिली आहे.
मंत्रालयाने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले, लष्कराकडून बनवण्यात आलेले हे अॅप व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, SAMVAD आणि GIMS सारखे आहे. हे अँड टू अँड एनक्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर करते. SAI लोकल इन-हाउस सर्वर आणि कोडिंग सोबत सिक्यॉरिटी फीचर्स सह बाकीच्या अॅप्सला चांगले बनवते. या फीचर्सला आवश्यकेनुसार बदलले जावू शकते.
अॅप ची CERT-in आणि आर्मी सायबर ग्रुप च्या पॅनल ऑडिटर्स द्वारा चाचणी करण्यात आली आहे. तसेच NIC वर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स (IPR) साठी फायलिंग वर काम सुरू आहे. यासाठी iOS प्लॅटफॉर्म वर अॅप आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संरक्षण मंत्रालयाने पुढे सांगितले, SAI चा पूर्ण लष्करासाठी वापर केला जाणार आहे. या सर्विस सोबत सिक्योर मेसेजिंगची सुरुवात होऊ शकते. अॅपच्या कार्यक्षमतेचा आढावा घेतल्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी कर्नल साई शंकर यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.