WhatsApp has brought great feature for the users

व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी आणले जबरदस्त फीचर, जाणून घ्या

तंत्रज्ञान

प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर नेहमी नवीन फीचर्स येत असतात. आता अॅपच्या लाइट आणि डार्क थीमसाठी कूल वॉलपेपर्सचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या आयफोनमध्ये लेटेस्ट व्हॉट्सअॅप अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर वेगवेगळ्या चॅट विंडो मध्ये वेगवेगळे वॉलपेपर लावता येईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सध्या व्हॉट्सअॅप मध्ये मिळणाऱ्या वॉलपेपर ऑप्शन मध्ये केवळ एक वॉलपेपर सेट केले जावू शकते, जे सर्व चॅट्स च्या बॅकग्राऊंडमध्ये दिसते. नवीन फीचर्स सोबत युजर्स प्रत्येक चॅट साठी वेगळ्या वॉलपेपर शिवाय, डार्क मोड मध्ये वेगळे वॉलपेपर लावू शकता. युजर्सना आपल्या फोनच्या गॅलरीमधून कोणत्याही फोटोला वॉलपेपर बनवता येईल, त्यासाठी कोणत्याही सॉलिड कलर किंवा डिफॉल्ट डूडल बॅकग्राउंडला निवडण्याचे ऑप्शन मिळणार आहे.

नवीन फीचर सर्च करण्याआधी तुमच्या फोनमधील व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट iOS व्हर्जन इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. WABetaInfo कडून नवीन अपडेट संबंधी ट्विट करण्यात आले आहे. WhatsApp for iOS 2.20.130 अॅप स्टोरवर उपलब्ध आहे. वॉलपेपर सेट करण्यासाठी अडवान्स्ड फीचर्स सपोर्ट आणले आहे. काही युजर्संना अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर हे फीचर मिळणार नाही. लवकरच अँड्रॉयड युजर्ससाठी यासारखेच फीचर्स दिले जावू शकते.

अपडेट केल्यानंतर तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील :

  1. आयफोनमध्ये व्हॉट्सअॅप ओपन करून अॅपची सेटिंग्समध्ये जा.
  2. या ठिकाणी Chat आणि पुन्हा Chat Wallpaper ऑप्शनवर टॅप करा.
  3. जर Dark Mode इनेबल असेल तर अॅपमध्ये उपलब्ध डार्क मोड वॉलपेपर सिलेक्ट करा. किंवा फोनवरून कोणताही फोटो सिलेक्ट करा. या ठिकाणी वेगवेगळे चॅट्स आणि ग्रुप्स साठी वॉलपेपर बदलू शकता.
  4. जर तुम्हाला लाइट थीमसाठी वॉलपेपर बदलायचा असेल तर डार्क मोड ऑफ करून त्यानंतर कस्टम वॉलपेपर सिलेक्ट करू शकता.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत