Young woman dies after charging iPhone falls into bathtub

चार्जिंगला लावलेला आयफोन बाथटबमध्ये पडल्याने तरुणीचा मृत्यू

ग्लोबल

बाथरुममध्ये चार्जिंगला लावलेला आयफोन बाथटबमध्ये पडल्याने २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रशियामधील आर्खांगेल्स्क शहरात घडली असून ओलेस्या सेमेनोवा असं मृत तरुणीचं नाव आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

२४ वर्षीय ओलेस्या सेमेनोवा आपली मैत्रिण डारियासोबत राहत होती. ओलेस्या एका कपड्यांच्या दुकानात कामाला होती. मंगळवारी डारिया घरी पोहोचली तेव्हा ओलेस्या तिला घरात दिसली नाही. पण जेव्हा ती बाथरुममध्ये गेली तेव्हा तिला धक्काच बसला. डारियाने सांगितलं कि, “मी ओलेस्याला बघून जोरात किंचाळले, ती पूर्ण पिवळी पडली होती आणि श्वासही घेत नव्हती. मी प्रचंड घाबरले होते, तिला हलवण्यासाठी मी तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर मला वीजेचा जोरात झटका लागला. तिचा फोन पाण्यात पडला होता आणि चार्जिंगला लावलेला होता.”

ओलेस्याने फोन चार्जिंगसाठी ज्या सॉकेटचा वापर केला होता, ती मेन लाईन होती आणि तिचा आयफोन-८ पाण्यात पडला होता. ओलेस्याचा मृत्यू वीजेच्या झटक्यामुळे झाल्याचं मृत्यूनंतरच्या तपासणीत स्पष्ट झालं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत