BSNL युजर्ससाठी कंपनीने घोषणा केली आहे की, २१ ऑक्टोबर पासून १३५ च्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरवर मिळणारा फायदा आता वाढवला आहे. ज्या युजर्संना सध्या टॅरिफ रिचार्ज केल्यानंतर दुसऱ्या नेटवर्कवर बोलण्यासाठी ३०० मिनिटे म्हणजेच ५ तास मिळत आहे. ते आता १४४० मिनिटे म्हणजेच २४ तासांपर्यंत दुसऱ्या नेटवर्कर बोलू शकतील.
तामिळनाडू राज्यात बीएसएनएल युजर्स २१ ऑक्टोबर पासून लोकल किंवा एसटीडी नेटवर्कवर महिन्यात १४४० मिनिटापर्यंत बोलू शकतात. ही सुविधा आधी ५ तासांपर्यंत होती. ती आता वाढून २४ तासांपर्यंत झाली आहे. यासाठी २४ दिवसांची वैधता आहे. बीएसएनएल युजर्स या सुविधेअंतर्गत एमटीएनएल दिल्ली आणि एमटीएनएल मुंबई नेटवर्कवर बोलू शकतात.
ही सुविधा सध्या बीएसएनएलने तामिळनाडू सर्कलमध्ये सुरू केली आहे. बीएसएनएल बाकीच्या राज्यात १३५ च्या टॅरिफवर मिळणाऱ्या लाभामध्ये कधीपर्यंत वाढ करू शकते, हे बीएसएनएल लवकरच स्पष्ट करू शकते.




