बेंगलुरू : जनता दल सेक्युलर नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्यावर षडयंत्र केल्याचा आरोप करत म्हटले की त्यांचा इतका मोठा विश्वासघात भाजपानेही केला नव्हता. पुढे ते म्हणाले की ते जाळ्यात अडकले होते. काँग्रेसशी हातमिळवणी करून त्यांच्या पक्षाने राज्यातील जनतेचा १२ वर्षांचा विश्वास गमावला. कुमारस्वामी म्हैसूर इथे बोलताना म्हणाले कि, ‘मी भाजपबरोबर चांगले […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
IND vs AUS 2nd T20I : ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाने सिरीजही जिंकली
IND vs AUS 2nd T20I : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सीरिजमधील दुसरी मॅच देखील टीम इंडियाने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 195 रन्सचं आव्हान टीम इंडियाने 19.4 ओव्हर्समध्ये पूर्ण करत ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन टीमच्या ओपनर्सने दमदार सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हर्समध्ये 5 […]
काहीही झालं तरीही कृषी कायदा रद्द होणार नाही – चंद्रकांत पाटील
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले कि, “शेतकरी आंदोलनाची केंद्राने गंभीर दखल न घेतल्यास हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही राहणार नाही.” यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं […]
ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं निधन
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन झाले आहे. रवी पटवर्धन यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. रवी पटवर्धन यांचा जन्म o6 सप्टेंबर 1937 रोजी झाला. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. रवी पटवर्धन यांनी 1974 मध्ये आरण्यक […]
IND vs AUS 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा T२० सामना
IND vs AUS 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा T२० सामना दुपारी १.४० पासून रंगणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स आणि सोनी टेन ३ वर करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना जिंकून मालिका विजयासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. ट्वेन्टी-२० मालिका विजयामुळे भारतीय संघाचा कसोटी मालिकेआधी आत्मविश्वास उंचावणार आहे. पुढील दोन्ही […]
कोवॅक्सिन लस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची लागण.. भारत बायोटेकनं सांगितलं कारण
चंदीगड : हरियानाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी डोस घेतला होता. तरीही अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र लसीचा डोस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची लागण कशी झाली याबाबत आता भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे. भारत बायोटेकने याबाबत ट्वीट करत माहिती […]
सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्कार जाहीर
पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे सीईओ अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंगापूरचं वृत्तपत्र ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’कडून हा पुरस्कार दिला जातो. आशियातील सहा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून यात पुनावाला यांच्या नावाचा समावेश आहे. करोना विरोधातील लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठी लस […]
सुनेच्या हत्येची सुपारी दिली, आरोपींनी केली सुपारी देणाऱ्या सासऱ्याची हत्या
मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या खूनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याला स्वतःचाच जीव गमवावा लागला. सुनेच्या हत्येची सुपारी दिलेल्या आरोपींनी सासऱ्याचाच खून केला. विनायक भिकाजी पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पुणे जिल्ह्यातील खेड येथे ही घटना घडली आहे. विनायक यांचा मुलगा अजित याचा विवाह झाला होता. विवाह झालेला असताना देखील अजितने कुटुंबीयांना न कळवता दोन वर्षापूर्वी […]
१ मे पर्यंत नागपूर ते शिर्डी प्रवास समृद्धी महामार्गावरून करू शकू – उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज अमरावती जिल्ह्यातील शिवणी (रसुलपूर) येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले कि, आज प्रथमच मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग या प्रकल्पाची पाहणी करायला आलो. या प्रकल्पाचे अप्रतिम काम चालू आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ज्याचा महाराष्ट्राला अभिमान […]
ज्येष्ठ नेता काही सांगत असेल तर अहंकार विसरून स्वीकारायला हवं, काँग्रेसच्या इशाऱ्यावर राऊत यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानानं महाराष्ट्र काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. “हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं,” असा इशाराच महाराष्ट्र काँग्रेसकडून देण्यात आला. यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे. “राहुल गांधी हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, पण […]










