answers to questions in your mind about restrictions for coronavirus in maharashtra
महाराष्ट्र

राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून कडक लॉकडाऊन, ब्रेक द चेन अंतर्गत जारी नवे नियम जाणून घ्या..

मुंबई : कोरोना संसर्गाचा वाढत धोका लक्षात घेता राज्यात आज (२२ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांनाच लोकल, मेट्रो, मोनो प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय खासगी प्रवासासाठी जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत जारी करण्यात आलेल्या […]

Senior Congress leader Dr. AK Walia dies due to corona
कोरोना देश राजकारण

ब्रेकिंग : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. ए. के. वालिया यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात सामान्य जनतेपासून ते नेतेमंडळी कोरोना विषाणूच्या विळख्यात येत आहेत. भारतात दररोज २,००० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री डॉ. एके वालिया यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रूग्णालयात उपचार […]

A well made half-century for Ruturaj Gaikwad off 33 deliveries
क्रीडा

ऋतुराज गायकवाडची चेन्नईकडून दमदार खेळी, ४२ चेंडूत ६४ धावा

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात IPL सामना सुरु आहे. दरम्यान, कोलकाताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी चेन्नईकडून उतरलेल्या ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस या सलामी जोडीने शतकी भागीदारी करत अत्यंत चांगली सुरुवात केली. ऋतुराज गायकवाडने 6 चौकार आणि 4 षटकार लगावत अतिशय दमदार अर्धशतक झळकावले. त्याने ४२ […]

idbi bank recruitment 2021
काम-धंदा देश

आयडीबीआय बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, अनेक पदं रिक्त, जाणून घ्या कसे अर्ज करणार..

नवी दिल्लीः तुम्ही जर बँक मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेने मुख्य डेटा अधिकारी, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी यांच्यासह अनेक पदांवर भरती काढलीय. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट idbibank.in च्या माध्यमातून पदासाठी अर्ज करू शकतात.  अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मे 2021 पर्यंत आहे. रिक्त जागांची माहिती […]

Father sexually assaults daughter
क्राईम देश पुणे महाराष्ट्र

धक्कादायक! नात्याला काळीमा फासणारी घटना.. जन्मदात्या पित्याचे मुलीसोबत लैंगिक चाळे

पुणे : पित्यानेच चार वर्षांच्या पोटच्या मुलीसोबत लैंगिक चाळे केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बापाविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वर्षभरापासून पित्याकडून हा लैंगिक छळ सुरू होता. चिराग हरबन्सलाल अरोरा (वय ३७) याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चार वर्षांच्या पीडित मुलीच्या आईने पोलिसांत […]

Union Education Minister Ramesh Pokhriyal infected with corona
कोरोना देश

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. ते म्हणाले कि, “माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने माझ्यावर उपचार सुरू आहेत. अलिकडच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सावधगिरी बाळगा आणि चाचण्या करून घ्या.” तसेच त्यांनी सर्व खबरदारी घेऊन शिक्षण मंत्रालयाचे काम नेहमीप्रमाणे […]

Oxygen Tank Leakage In Nashik Corporation Hospital
नाशिक महाराष्ट्र

नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधून गळती; 22 जणांचा मृत्यू

नाशिक : नाशिकमधील महानगरपालिकेच्या जाकीर हुसैन या रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गळती झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानंतर मृतांचा आकडा वाढला असून 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. नाशिक शहरातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या जाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्याने […]

India's 'Covishield' fully capable of fighting the new strain of Corona
कोरोना देश

सीरम इन्स्टिट्यूटची महत्त्वाची घोषणा, कोविशिल्ड लसीचे दर निश्चित, जाणून घ्या किती पैसे मोजावे लागणार?

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणाऱ्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’नं महत्त्वाची घोषणा केली आहे. सीरमनं कोविशिल्ड लसीचे दर जाहीर केले असून अन्य देशांतील लसीपेक्षा कोविशिल्डचे दर कमी राहतील याची काळजीही घेण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या स्वाक्षरीनं या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस देण्यात आलं आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं […]

PL Double Header: Match between Punjab and Hyderabad
क्रीडा

IPL डबल हेडर : आज दुपारी पंजाब आणि हैदराबाद यांच्यात सामना, तर रात्री कोलकाता आणि चेन्नई यांच्यात सामना

IPL 2021 : आयपीएलच्या १४व्या हंगामात आज होणाऱ्या डबल हेडर मध्ये पहिला सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुपारी ३.३० वाजता तर दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रात्री ७.३० वाजता होणार आहे. डबल हेडरमधील पहिल्या लढतीमधील पंजाब आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. त्यापैकी पंजाबचा […]

Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital
महाराष्ट्र मुंबई

शरद पवार पुन्हा एकदा ब्रीच कँण्डी रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रीच कँण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. शरद पवार यांना काल रात्री ब्रीच कँण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मागील महिन्यात त्यांच्यावर एन्डोस्कोपी करुन त्यांच्या पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती […]