रांची : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि आई देवकी देवी या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोघांना उपचारासाठी झारखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धोनीच्या आई-वडिलांना रांचीमधील बरियातू रोड येथील पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
‘त्या’ हत्या प्रकरणात पोलिस दोषी, उर्वरित आयुष्य तुरुंगातच काढावं लागणार….
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या न्यायालयाने मिनियापोलिसातील माजी पोलिस अधिकारी डेरेक शॉविनला जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. वॉशिंग्टनच्या हेनेपिन काउंटी न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायाधिशांनी डेरेकला निर्घृण हत्या प्रकरणात दोषी ठरवले असून त्याला लवकरच शिक्षा सुनावली जाऊ शकते. शॉविन विरोधात सेकेंड डिग्री मर्डर, थर्ड-डिग्री मर्डर आणि मैनस्लॉटर असे तीन आरोप होते. यात त्याला सेकंड डिग्री […]
ऑक्सिजनअभावी ५०० रुग्णांचे प्राण धोक्यात असतानाच घडले असे काही…
दिल्ली : रेमडेसिवीरसोबतच ऑक्सिजनचा होणारा तुटवडा अनेक राज्यांसाठी चितेंची बाब ठरली आहे. राजधानी दिल्लीत ५०० कोरोना रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयात ऑक्सिजन संपल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. वेळ हातातून निघून चालली असतानाच ऑक्सिजनचा टँकर पोहोचला आणि सर्वांना दिलासा मिळाला. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात ऑक्सिजन संपत आला असल्याचं सांगितल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास […]
रेल्वे ट्रॅकवर चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या मयुरला मुख्यमंत्र्यांकडून शाबासकीची थाप, तर मध्य रेल्वेकडून पारितोषिक जाहीर
मुंबई : रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला. आपल्या जीवाची पर्वा […]
राज्यांनी लॉकडाऊनला अंतिम पर्याय म्हणून पाहावं – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चिंतेत भर पडली असून राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. त्यांनी यावेळी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले कि, देशात कोरोनाची दुसरी लाट तुफान बनून आली. ज्यांनी आपल्या नातलगांना गमावलं आहे. त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. […]
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ निर्णय
मुंबई : विविध शासकीय विभागांच्यामार्फत खाजगी माल वाहतूकदारांकडून जी वाहतूक करण्यात येते, त्यातील 25 टक्के माल वाहतुकीचे काम राज्य परिवहन महामंडळास देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. राज्य परिवहन महामंडळाकडे उपलब्ध माल वाहतुकीची वाहने विचारात घेता राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत निविदा प्रक्रिया करुन खाजगी माल […]
18 वर्षांवरील व्यक्तीने लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची? जाणून घ्या
नवी दिल्लीः देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञां मत आहे. त्यामुळे १ मे पासून देशात १८ वर्षाच्या वरील सर्व व्यक्तींना कोविड १९ लस दिली जाणार आहे. रजिस्टर कसे करायचे, जाणून घ्या. कोविड १९ लससाठी असे करा रजिस्ट्रेशन : सर्वात आधी तुम्हाला www.cowin.gov.in वर जावे […]
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाचे नव्याने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्वे..
मुंबई : कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. साथीचे रोग कायदा १८९७ च्या कलम दोन, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार सदर […]
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन
मुंबई : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या विनोदी पात्रांनी गाजवलेल्या सुप्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन झालं. दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर किशोर नांदलस्कर यांनी दुपारी 12.30 च्या सुमारास ठाणे इथे अखेरचा श्वास घेतला. किशोर नंदलास्कर यांचे नातू अनीश म्हटले कि, माझ्या आजोबांना बुधवारी ठाणे येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले […]
धक्कादायक! बुद्धांना प्रसन्न करण्यासाठी बौद्ध भिक्खूने दिला स्वत:चाच बळी..
बँकॉक: थायलंडमध्ये थम्माकोर्न वांगप्रीचा असे नाव असलेल्या बौद्ध भिक्खूने स्वत:चे मुंडके कापून बळी दिला. ते ६८ वर्षांचे होते. उच्च अध्यात्मिक रुपात पुर्नजन्म घेण्यासाठी स्वत:चा स्वत: त्याग करणे हे सर्वोच्चपणाचे लक्षण असून नव्या जीवनात अध्यात्माच्या नव्या स्तरावर पोहचण्यासाठी आणि निर्वाणासाठी संधी मिळेल असा त्यांचा दावा होता. मागील पाच वर्षांपासून या विचित्र बलिदानाची तयारी करत होते, असे […]










