Actor Jimmy Shergill arrested for Shooting in Night Curfew
कोरोना मनोरंजन

अभिनेता जिमी शेरगिल याला अटक, कोरोना काळात केले असे काही…

लुधियाना : अभिनेता जिमी शेरगिल याला अटक करण्यात आली आहे. आज (बुधवार) पंजाबच्या लुधियाना येथे कोरोना मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, या कारवाईच्या एक दिवस अगोदर त्यांना ही शूटिंग थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांच्याकडून दंड देखील वसूल करण्यात आला होता. तरीदेखील नाईट कर्फ्यूचे उल्लंघन करून जिमी शेरगिल पुन्हा […]

Know, why dry run of corona vaccine is important?
कोरोना महाराष्ट्र

खुशखबर! महाराष्ट्रातील १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत कोरोना लस, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय!

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाचं सावट अधिक गडद होत असतानाच महाराष्ट राज्यात लसीकरण प्रक्रियेला अतिशय झपाट्यानं वेग आला आहे. लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शासनानं लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेला मोफत लसीकरणाचा मुद्दा अखेर निकाली निघाला. महाराष्ट्र वासीयांना खुशखबर देत राज्यातील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असल्याचा निर्णय […]

lockdown GOA
कोरोना देश

ब्रेकिंग : गोव्यामध्ये संपूर्ण लॉकडाउन, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली घोषणा

पणजी : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली आहे. गोवा सरकारने आज घोषणा केली आहे की उद्या (गुरुवार) सायंकाळपासून राज्यात लॉकडाउन लागू करण्यात येईल. गोव्यामध्ये 29 एप्रिल रोजी संध्याकाळपासून 3 मे रोजी सकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाउन असणार आहे. लॉकडाऊन दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाईल, अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री […]

nagpur 85 year old rss swayamsevak sacrifise his oxygen bed for 40 year old man
कोरोना देश

‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ : 85 वर्षीय आजोबांनी ‘मी माझं जीवन जगलो आहे..’ असे म्हणत आपला बेड तरुणाला दिला आणि…

नागपूर : ‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ अगदी याच उक्तीप्रमाणे एका 85 वर्षीय आजोबांनी एका तरुण व्यक्तीसाठी स्वत:चा ऑक्सिजन बेड सोडला. नारायण भाऊराव दाभाडकर असं या आजोबांचं नाव आहे. परंतु ऑक्सिजन बेड सोडल्यानंतर पुढील तीन दिवसात त्यांचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असणारे नारायण भाऊराव दाभाडकर रुग्णालयात भरती होते. त्यांची ऑक्सिजन पातळी 60 […]

Superstar Allu Arjun infected with corona
मनोरंजन

सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण

साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण झाली आहे. अल्लू अर्जुनने स्वतः सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे. तो सध्या विलगीकरणात आहे. अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं कि, ”हॅलो एव्हरीवन, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. सगळ्यांना विनंती आहे जे माझ्या संपर्कात आले त्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोनाची […]

massive explosion at m r pharma chemical company lote midc khed
महाराष्ट्र रत्नागिरी

लोटे एमआयडीसीत पुन्हा भीषण आग, एम आर फार्मा केमिकल कंपनीत भीषण स्फोट

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे एमआयडीसीत पुन्हा एका कंपनीला भीषण आग लागली आहे. केमिकल कंपनीत स्फोट झाल्यानंतर आग पसरल्याचे माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोटे एमआयडीसीतील एम आर फार्मा केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. आज सकाळी 11 वाजता ही दुर्घटना घडली आहे. स्फोट […]

Emergency use of Bharat Biotech's Covaxin also approved
देश

मोठी बातमी : भारताची ‘ही’ कोरोना लस कोरोनाच्या ६१७ प्रजातीवर गुणकारी

नवी दिल्ली : भारतीय लस कोवॅक्सिन ही कोरोनाच्या 617 व्हॅरिएंटवर गुणकारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे. ही माहिती व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि अमेरिकेचे ख्यातनाम वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अॅन्थोनी फाऊची यांनी दिली आहे. भारतात कोरोनामुळे हाहाकार माजलेला असताना कोवॅक्सिन लस 617 प्रकारच्या कोरोना प्रजातींवर गुणकारी असल्याचा अमेरिकेचा […]

Congress leader Eknath Gaikwad passes away
महाराष्ट्र राजकारण

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पितृशोक, काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन

मुंबई : काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं आहे. ते राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना ब्रीच […]

Severe tremors in Assam Arunachal Pradesh
देश

आसाम अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; इमारतींना तडे

आसाम : आसामसह पूर्वेकडील काही राज्यांत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. आसाममध्ये सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी लागोपाठ दोन झटके जाणवले. त्यामुळे लोक आपापल्या घराबाहेर पडले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा पहिला धक्का ७ वाजून ५१ मिनिटांनी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील सोनीतपूरमधील ढेकियाजुली येथे होता. त्यानंतर नंतर लागोपाठ दोन […]

modi is a super spreader
कोरोना देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ – डॉ. नवज्योत दाहिया

नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ असल्याचं म्हटलं आहे. देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असताना राजकीय सभा घेणे तसेच कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सहमती दर्शवल्याने कोरोनाचा मोठ्याप्रमाणात प्रसार झाल्याने डॉ. नवज्योत यांनी मोदींना सुपर स्प्रेडर म्हटल्याचं, द ट्रेब्युने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. इंडियन मेडिकल […]