Congress leader Eknath Gaikwad passes away

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पितृशोक, काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन

महाराष्ट्र राजकारण

मुंबई : काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं आहे. ते राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरु असताना आज सकाळी १० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

एकनाथ गायकवाड काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष राहिले होते. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविलं होतं. एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. दक्षिण मध्य मुंबईतून दोन वेळा ते निवडून आले होते. नंतर मात्र शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत