Prime Criticare Hospital
ठाणे महाराष्ट्र

पुन्हा अग्रितांडव! ठाण्यातील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटला आग; चार रुग्णांचा मृत्यू

ठाणे: राज्य कोरोनाच्या संकटाशी झुंजत असतानाच दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांच्या आठवणी विस्मृतीत जात नाही. मुंब्रा कौसा येथील प्राइम क्रिटीकेअर या हॉस्पिटलला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे.  या रुग्णालयात एकूण 26 रुग्ण होते. यामध्ये 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मिळालेल्या माहिती नुसार, […]

Remedesivir injection - Dr. Sujay Vikhe
अहिल्यानगर कोरोना महाराष्ट्र राजकारण

‘तो’ व्हिडिओ पाहिला तर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, कोणत्याही कारवाईला घाबरत नाही – खासदार सुजय विखे

नगर : खासदार सुजय विखे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मुद्यावर आपले मत स्पष्ट शब्दांत मांडले आहे.  आपल्याकडे सर्व कागदपत्रे आहेत असून कोणत्याही कारवाईला आपण घाबरत नाही. इंजेक्शनमुळे ज्यांचे जीव वाचले, ते लोक माझ्या पाठिशी आहेत. ती इंजेक्शन संपली आहेत. इंजेक्शनचे रिकामे बॉक्स आता शिल्लक आहेत. त्यामुळे जप्त काय करणार? माझा तो व्हिडिओ नीट पाहिला तर सर्व […]

Four women from the same family were raped
क्राईम नागपूर महाराष्ट्र

महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी; हॉस्पिटलमध्ये अत्याचाराचा प्रयत्न

नागपूर:  महिला डॉक्टरकडे  हॉस्पिटलमध्येच शारीरिक सुखाची मागणी करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर मधील कोराडी मार्गावरील एका हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून सहकारी डॉक्टरला अटक केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, डॉ. नंदु रहांगडाले (वय ३९) असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे. पीडित […]

Blood bank
कोरोना रक्‍तदान

आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या – पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई  : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्वपूर्ण टप्पा 1 मे पासून सुरू होणार असून 18 वर्षांपुढील सर्वजण लस घेऊ शकणार आहेत. लस घेतल्यानंतर 60 दिवस आपणास रक्तदान करता येत नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करावे, असे आवाहन मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, आता रुग्णालयांमध्ये कोविड […]

The girl was gang-raped and thrown unconscious on the street
क्राईम देश

धक्कादायक : विवाहित महिलेवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार, महिलेला रस्त्यावर फेकून आरोपी पसार

लखनौ : आग्य्रात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न सोहळ्यात जेवण बनवणाऱ्या मदतनीस महिलेवर कॅटररसह पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. रविवारी हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेला गंभीर अवस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला छोट्या समारंभांमध्ये जेवण बनवण्यासाठी मदतनीस […]

balasaheb thorat
अहिल्यानगर कोरोना महाराष्ट्र राजकारण

महसूलमंत्री थोरात यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, यंत्रणा कमी पडतेय म्हणत नमूद केल्या अनेक त्रुटी…

अहमदनगर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकताच अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी त्यांनी ठिकठिकाणच्या कोविड केअर सेंटरला भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी निरीक्षणे पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना कळविली आहेत. स्वत:च्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दाखवून दिल्या आहेत. यात सुधारणा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात थोरात यांनी म्हटले आहे, आपण नगर जिल्ह्याचा तालुकानिहाय दौरा […]

kannada actress shanaya katwe arrested in brother murder case chopped body parts
क्राईम मनोरंजन

अभिनेत्री शनाया काटवेला भावाच्या खूनप्रकरणी अटक, वेगवेगळ्या ठिकाणी मिळाले होते मृतदेहाचे तुकडे

नवी दिल्ली : कन्नड फिल्म इंडस्ट्रीकडून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड अभिनेत्री शनाया काटवे हिला हुबळीच्या पोलिसांनी अटक केली आहे. शनायावर तिच्या भावाची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शनायाचा भाऊ राकेश कटवे याचा मृतदेह वेगवेगळ्या रस्त्यांवरून ताब्यात घेतला आहे. वृत्तानुसार, पोलिसांना राकेशची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांना देवरगुडीहलच्या जंगलात राकेश […]

Do not take Covishield and Covaxin vaccines if you have these problems
कोरोना महाराष्ट्र

महाराष्ट्रात १ मेपासून होणाऱ्या लसीकरण मोहीमवर प्रश्नचिन्ह…

मुंबई : 1 मे पासून देशात 18 वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली असून राज्य सरकारनेही व्यापक लसीकरणाची मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये जवळपास 8 कोटीच्या वर नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. परंतु असं असलं तरी आता या लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण राज्याला हव्या तितक्या प्रमाणात लसीच उपलब्ध झालेल्या […]

Actress Hina Khan infected with corona
कोरोना मनोरंजन

अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच वडिलांचं झालं होतं निधन

मुंबई : अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण झाली आहे. तिने याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ती घरीच विलगीकरणात असून सर्व नियमांचं पालन करत आहे. तिने सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सहा दिवसांपूर्वीच हिना खानच्या वडिलांचं निधन झालं होतं. आता हिनाला कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली […]

The second wave of corona in Maharashtra will completely subside in the first week of May
कोरोना महाराष्ट्र

दिलासा! महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट लवकरच पूर्णपणे ओसरणार

मुंबई : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 31 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असे टास्क फोर्समधील डॉक्टरांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोरोनाची […]