Actor Jimmy Shergill arrested for Shooting in Night Curfew

अभिनेता जिमी शेरगिल याला अटक, कोरोना काळात केले असे काही…

कोरोना मनोरंजन

लुधियाना : अभिनेता जिमी शेरगिल याला अटक करण्यात आली आहे. आज (बुधवार) पंजाबच्या लुधियाना येथे कोरोना मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, या कारवाईच्या एक दिवस अगोदर त्यांना ही शूटिंग थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांच्याकडून दंड देखील वसूल करण्यात आला होता. तरीदेखील नाईट कर्फ्यूचे उल्लंघन करून जिमी शेरगिल पुन्हा शूटिंगसाठी जात होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अभिनेता जिमी शेरगिलच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सोशल डिस्टंसिंग तसेच कोरोनाचे इतर नियम पायदळी तुडवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. जिमी शेरगिल एका पंजाबी चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्यासाठी आर्य स्कूलला लुधियाना सत्र न्यायालयाचे स्वरूप देण्यात आले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच एसीपी वरियाम सिंह पोलिसांसह तेथे पोहोचले. त्यांनी शूटिंग बंद करण्यास सांगितले. टीमने पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. सेटवर जवळपास दीडशे लोक उपस्थित होते. पोलिसांनी तत्काळ जिमी शेरगिलसह 4 जणांना अटक केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत