नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. यशपाल शर्मा यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यशपाल शर्मा १९८३ विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते. यशपाल शर्मा हे 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा एक महत्त्वाचा भाग होते. त्यांनी विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात 89 धावांचा शानदार डाव […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मोठी बातमी! नाशिक करन्सी नोट प्रेसमधून पाच लाख रुपयांच्या नोटा गायब
नाशिक : नाशिक करन्सी नोट प्रेसमधून पाच लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दोन आठवड्यापूर्वी ही घटना उघड झाली होती. मात्र, कडेकोट सुरक्षाव्यवस्था असतानाही पाच लाखांच्या नोटा गायब झाल्याने मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सोमवारी मुद्रणालयातील अधिकारी उपनगर पोलीस […]
एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या कोठडीत वाढ
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या आठवड्यात ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली असून आता १५ जुलैपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने न्यायालयाला सांगितलं की या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणखी काही लोकांचे जबाब नोंदवण्याचे काम सध्या सुरु […]
चंद्रपुरात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु
चंद्रपूर : चंद्रपूरमधील दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासह कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. दहा दिवसांपूर्वीच या कुटुंबात विवाह झाला होता, अशी माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास झालेल्या या गॅसगळतीमध्ये एकाच कुटुंबातील सातजण बेशुद्ध पडले. गॅस गळती झाल्याचं लक्षात आल्यानंतर लष्कर कुटुंबातील सातही जणांना डॉक्टर विश्वास झाडेंच्या […]
पुण्यात भरदिवसा कोयत्याचे वार करून तरुणाची हत्या, शेजाऱ्यानेच केले हे भयंकर कृत्य
पिंपरी चिंचवड : एका व्यक्तीला त्याच्या शेजाऱ्याने कोयत्याचे वार करून ठार मारल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कानिफनाथ लक्ष्मण क्षीरसागर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. व्हिडिओ फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी 4 तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दीड वाजता क्षीरसागर हे आपल्या […]
कोरोना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस लैंगिक संबंध न ठेवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
नवी दिल्ली : संपूर्ण जगात सध्या कोरोना लसीकरण सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर तज्ज्ञ लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर अनेक गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देतात. डेली मेलच्या अहवालानुसार, रशियामधील लोकांना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस लैंगिक संबंध न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम करू नये, असा सल्ला यापूर्वी तज्ज्ञांकडून देण्यात आला […]
हवामान विभागाकडून तळकोकणात रेड अलर्ट जारी, नदीची पाणी पातळी वाढल्यास मुंबई-गोवा महामार्ग बंद
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे राजापुर येथील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून सतर्कतेचा इशारा दिला आहे. राजापूर तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे शहरात पूर पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाकडून तळकोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं नारायण राणे यांचं अभिनंदन
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले खासदार नारायण राणे यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना, काँग्रेस, स्वत:चा स्वाभिमान पक्ष आणि आता भाजप असा प्रवास करणारे नारायण राणे यांना मोदी सरकारमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेत असताना नारायण […]
IBPS क्लर्क पदाच्या 5830 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी, ऑनलाइन नोंदणीला सुरुवात
मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) क्लर्क पदासाठीच्या 5830 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ibps.in या आयबीपीएसच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी व अर्ज करावा. या जागा देशातील विविध बँकांमध्ये भरल्या जातील. तीन वेगवेगळ्या तारखांना ही परीक्षा घेण्यात येणार असून कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजे CRP च्या माध्यमातून ही […]
इनकम टॅक्सच्या नवीन पोर्टलच्या तांत्रिक उणीवांचा फटका, ‘या’ कामांमध्ये येताय अडचणी
नवी दिल्ली : इनकम टॅक्सचे नवीन पोर्टल www.incometax.gov.in मुळे अजूनही अनेक जणांना त्रास सहन करावा लागत आहे. नवीन पोर्टल लॉन्च होऊन आता एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे, परंतु, अजूनही त्याच्या तांत्रिक उणीवा दूर करण्यात आलेल्या नाहीत. अर्थमंत्र्यांनीही दोन आठवड्यांपूर्वी या पोर्टलच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) म्हणतात की या पोर्टलवर ई-प्रोसेसिंग आणि […]










