पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वाढीव मदतीचा प्रस्ताव आणणार मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी निर्देश दिल्याप्रमाणे तातडीची मदत म्हणून एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) मधील निकषांप्रमाणे बाधितांना मदत सुरु करण्यात आली असून या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र, पुढील तीन-चार दिवसांत राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत राज्यातील ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस […]
होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक
मुंबई : राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही देताना राज्यात शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. मंत्रालयात होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत बैठक झाली, यावेळी ते बोल्ट होते. शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास तातडीने सादर करावा, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राष्ट्रीय […]
चिपळूण शहराच्या स्वच्छतेसाठी २ कोटी रुपयांचा निधी, एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई : चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तात्काळ स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, चिपळूणचे आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच […]
वन्य प्राण्यांना दत्तक घ्या – संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची योजना
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येतील. सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इथे केली जाते. उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. वाघ : रुपये ३,१०,००० सिंह : रुपये ३,००,००० बिबट : […]
भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहूल घोगरे यांच्या कडून पूरग्रस्तांसाठी मदतनिधी सुपूर्द
लोणी : कोकण आणि परिसरातील नागरीकांच्या मदतीसाठी भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भाजयुमोचे उपाध्यक्ष राहूल घोगरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ११ हजार रूपयांची रक्कम मदतनिधीस सुपूर्द केली. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने झालेल्या नूकसानीत तिथल्या नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. या नागरीकांना दिलासा देण्यासाठी शिर्डी मतदारसंघातील नागरीक आणि कार्यकर्त्यांनी गावपातळीवर पुढाकार घेण्याचे […]
डॉ. कीर्ती शैलेश जळकोटे यांनी ग्रेसफुल मेडिक्वीन टायटल जिंकलं..
पुणे : मेडिक्वीन मेडिको पिजंट तर्फे डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर यांच्याकडून मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व महिला डॉक्टरांसाठी सौन्दर्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेचे दुसरे पर्व होते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून सुमारे ३०० महिला डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. त्यातून ४० स्पर्धक शेवटच्या फेरीमध्ये पोहोचले. या स्पर्धकांमधून ६ विजेते घोषित करण्यात आले. पुण्याच्या डॉ. कीर्ती […]
डॉ. मनस्वी जाधव-वरेकर ठरल्या मिसेस ब्रेव अँड ब्युटीफुल मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र
पुणे : मेडिक्वीन मेडिको पिजंट तर्फे डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर यांच्याकडून मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व महिला डॉक्टरांसाठी सौन्दर्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेचे दुसरे पर्व होते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून सुमारे ३०० महिला डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. त्यातून ४० स्पर्धक शेवटच्या फेरीमध्ये पोहोचले. या स्पर्धकांमधून ६ विजेते घोषित करण्यात आले. कोल्हापूरच्या डॉ. मनस्वी […]
RBI मध्ये वैद्यकीय सल्लागार पदावर भरती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आस्थापनेत भरती निघाली आहे. याअंतर्गत वैद्यकीय सल्लागार पदांच्या ४ रिक्त जागा भरण्यात येत आहे. आरबीआयतर्फे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी मिळणारा पगार, शैक्षणिक पात्रता यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या आस्थापनेवरील वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज […]
मराठवाड्यातील पाणीटंचाई असणाऱ्या भागांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा- जयंत पाटील
मुंबई : मराठवाड्यातील पाण्याची तीव्र अडचण भासत असणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा व भागांचा अभ्यास करावा तसेच या भागांना पाणी देण्यासाठीचे पर्याय शोधावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिले. सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमवेत मंत्रालय येथे बैठक झाली. या बैठकीत भराडी बृहत लघु पाटबंधारेसंदर्भात सर्वेक्षण […]










