Bank transactions will now become more expensive, RBI approves rate hike
अर्थकारण देश

अलर्ट! उद्यापासून ATM मधून पैसे काढणे महागणार

मुंबई : एटीएममधून आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढणे महाग होणार आहे. आरबीआयचे हे नवीन नियम उद्यापासून म्हणजे 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. आरबीआयने सर्व बँकांच्या एटीएमवरील आर्थिक व्यवहारांवरील इंटरचेंज फी 15 रुपयांवरुन वाढवून 17 रुपये केली आहे. त्याचप्रमाणे गैर आर्थिक म्हणजे नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये करण्यात आली […]

Mla Ganapatrao Deshmukh
महाराष्ट्र राजकारण सोलापूर

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन; राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले…

सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. ते ९४ वर्षाचे होते. त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र आज सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक ढासळली आणि रात्री ९ च्या सुमारास त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून […]

baby
क्राईम देश

नर्सने दोन महिन्यांच्या बाळाला केली अमानुष मारहाण, हातही झाला फ्रॅक्चर

नवी दिल्ली : रुग्णालयात एका नर्सने दोन महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात बाळाचा हातही फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं आहे. ही घटना 24 जुलै रोजी रात्री घडली. सीसीटीव्ही फुटेजमधून नर्सने बाळाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नर्सला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये राहणाऱ्या सबीब यांनी […]

Mumbai High Court
महाराष्ट्र मुंबई

हे म्हणजे शिल्पा शेट्टीविषयी काहीच बोलू नका सांगण्यासारखं – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मीडियाच्या विरोधात दावा दाखल केला होता. शिल्पा शेट्टीने मीडियाविरोधात दाखल केलेल्या बदनामीच्या दाव्यावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने म्हटले की शिल्पा शेट्टी यांनी केलेल्या दाव्याचा अर्थ वेगळा निघतो. हे आमच्याबद्दल चांगलं बोलणार नसाल तर काही बोलूच नका, असं मीडियाला सांगण्यासारखं आहे. सध्या पॉर्न फिल्म प्रकरणी कोठडीत असलेला […]

There will be no shortage of funds for Metro work in Pune - Ajit Pawar
पुणे महाराष्ट्र

कोणत्याही परिस्थितीत मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – अजित पवार

पुणे : पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते, या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या ट्रायल रनचाही उल्लेख करावा लागेल. ‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन […]

problem of rehabilitation of villages at risk of permanent floods
कोल्हापूर महाराष्ट्र

कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोल्हापूर : कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू, पूरग्रस्त भागाची पाहणी करत असून याबाबत जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीची […]

शैक्षणिक

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, ते आपला वैयक्तिक निकाल दुपारी २ वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकणार आहेत. बोर्डाने निकालासाठी तीन लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत. असा तपासा निकाल : बोर्डाच्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा. सीबीएसई रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा. या पेजवर दहावी आणि बारावी […]

Drunk Man Climb Up High Tension Electric Tower in Jalna
महाराष्ट्र

बापरे! पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर तरुण सासुरवाडीत पोहोचला आणि थेट वीज टॉवरवर चढला…

जालना : पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर एका तरुणाने सासरी जाऊन असा स्टंट केला की सासरच्यांच्या तोंडचे पाणी पळाले. हा तरुण उच्च दाबाच्या वीज टॉवरवर चढला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात सोनखेडा-भराडखेडा शिवारात हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश शेळके नावाच्या तरुणाने मद्यप्राशन केल्यानंतर हा सर्व प्रकार केला. काल मंगेश शेळके या तरुणाचे […]

Yuzvendra Chahal Krishnappa Gowtham test positive for covid 19 in Shrilanka
क्रीडा

ब्रेकिंग : युजवेंद्र चहल आणि के गौतम यांना कोरोनाची लागण, संघाबरोबर भारतात परतता येणार नाही

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्यानंतर आता स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि के गौतम यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मंगळवारी कृणाल पांड्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मनीष पांडे, ईशान किशन आणि के गौतम यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या आठ भारतीय […]

Education department instructs to keep schools closed for some time from March 1 if necessary
महाराष्ट्र

पूरबाधित शाळांतील शिक्षण पूर्ववत करावे – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थ‍ितीमुळे नुकसान झालेल्या शाळांची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली. क्षतीग्रस्त शाळांच्या दुरुस्तीचे नियोजन करून तेथे लवकरात लवकर शिक्षण सुरु करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बैठकीत उपस्थित शालेय शिक्षण अधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांच्या नुकसानासंबंधी माहिती दिली. ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तकांचे नुकसान झालेले आहे, त्या ठिकाणी […]