मुंबई : टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेचं कांस्यपदक जिंकणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. पी. व्ही. सिंधुने देशासाठी दुसरं ऑलिंपिक पदक जिंकून देशाचा गौरव वाढवला आहे. तिनं जिंकलेल्या ऑलिंपिक कांस्यपदकाचा आनंद देशवासियांसाठी सुवर्णपदकापेक्षा कमी नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी तिचे कौतुक केले आहे. उपमुख्यमंत्री […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली ‘एमपीएससी’ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा शासननिर्णय जारी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 28 जुलै रोजी झालेल्या बैठकीनंतर अवघ्या दोन दिवसात 30 जुलै रोजी वित्त विभागाचा हा शासन निर्णय जारी […]
महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ
नवी दिल्ली : महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत 73.5 रुपये प्रति सिलेंडर इतकी वाढ केली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती या महिन्यात स्थिर आहेत. या वाढीनंतर दिल्लीमध्ये 19 किलोच्या कमर्शिअल गॅसच्या किंमती वाढून 1623 रुपये प्रति सिलेंडर झाल्या आहेत. 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या […]
महाराष्ट्रात आढळला झिका विषाणूचा पहिला रुग्ण, जाणून घ्या काय काळजी घ्यावी…
पुणे : महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेपुढे एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर गावात राज्यातील झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. 55 वर्षीय महिलेत झिका विषाणू आढळला होता. तो रुग्ण जरी बरा झाला असला तरी त्याची बाधा अनेकांना झाल्याची शक्यता असल्याने बेलसर परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला […]
भगतसिंग नाटकाची रिहर्सल करताना चिमुकला स्टूलवरून घसरला, गळफास लागून दुर्दैवी मृत्यू
उत्तर प्रदेश : नाटकाची रिहर्सल करताना गळफास लागून एका १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 15 ऑगस्ट रोजी भगतसिंग यांच्यावरील नाटक सादर करण्यासाठी तालीम करताना या चिमुकल्याला गळफास लागला. उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील सिव्हिल लाईन्स परिसरातील एका गावात ही दुःखद घटना घडली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांच्या कारवाईविनाच कुटुंबाने या […]
सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल असलेली नकारात्मक प्रतिमा सुधारणे हे मोठे आव्हान – पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पोलीस सेवा(आयपीएस) प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. यात पंतप्रधान मोदींनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गृह राज्यमंत्री नित्यानंद रायही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, लोकांची पोलिसांबद्दल असलेली नकारात्मक धारणा हे एक मोठं आव्हान आहे आणि ही प्रतिमा बदलण्यासाठी प्रशिक्षणार्थींनी […]
महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्टपासून
मुंबई : शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. आता महसूल […]
राज्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज
मुंबई : राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे […]
लसीकरणाची गती वाढवावी, अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो – WHO
नवी दिल्ली : जगभरातल्या सर्व देशांनी कोरोना लसीकरणाची गती वाढवावी, अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या वर्षाच्या सप्टेंबर अखेर सर्वच देशांनी आपल्या किमान 10 टक्के नागरिकांना लस मिळेल यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. तसेच या वर्षाच्या अखेरपर्यंत जगभरातल्या 40 टक्के लोकांना लस मिळण्याची आवश्यकता आहे, असंही […]
गॅस सिलेंडर सबसिडीचा लाभ मिळत नसेल तर काय करावे? जाणून घ्या…
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती सतत वाढत आहेत. एलपीजीचे दर उद्या म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी पुन्हा निश्चित केले जातील. त्यामुळे पुन्हा सिलेंडरच्या किमती वाढू शकतात. अशा परिस्थितीत सबसिडी अत्यंत महत्वाची झाली आहे. जर तुम्हाला सबसिडीचा लाभ मिळत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही पुन्हा सबसिडी मिळवू शकता. गॅस सबसिडीसाठी अर्ज करण्यासाठी […]










