लोणी : कोकण आणि परिसरातील नागरीकांच्या मदतीसाठी भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भाजयुमोचे उपाध्यक्ष राहूल घोगरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ११ हजार रूपयांची रक्कम मदतनिधीस सुपूर्द केली.
कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने झालेल्या नूकसानीत तिथल्या नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. या नागरीकांना दिलासा देण्यासाठी शिर्डी मतदारसंघातील नागरीक आणि कार्यकर्त्यांनी गावपातळीवर पुढाकार घेण्याचे आवाहन भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. याचाच एक भाग म्हणून आ. विखे पाटील यांनी आपले स्वतःचे एक महीन्याचे वेतन या मदतनिधीस देण्याचे जाहीर केले.
आ. विखे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे उतर नगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहूल घोगरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ११ हजार रूपयांची रक्कम कोकण येथील पूरग्रस्तांसाठी आ. विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त केली. याप्रसंगी भाजयुमोचे सचिव सचिन शिंदे शरद आहेर एस पी आहेर बंटी आहेर रविंद्र गाढे, महेश लोखंडे आदी उपस्थित होते.
कोकण आणि इतरही काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नूकसान झाले आहे. या भागातील नागरीकांना माणूसकीच्या भूमिकेतून मदत करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याचे आवाहन आ. विखे पाटील यांनी पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरीकांना केले आहे.




