Adopt wild animals and Help wildlife conservation - Sanjay Gandhi National Park Scheme
महाराष्ट्र मुंबई

वन्य प्राण्यांना दत्तक घ्या – संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची योजना

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येतील. सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इथे केली जाते. उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वाघ : रुपये ३,१०,०००

सिंह : रुपये ३,००,०००

बिबट : रुपये १,२०,०००

वाघाटी : रुपये ५०,०००

नीलगाय : रुपये ३०,०००

चितळ : रुपये २०,०००

भेकर : रुपये १०,०००

वन्यजीव प्रेमी, संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना १ वर्षाकरिता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावे, असे आवाहन वनसंरक्षक व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे. ही दत्तक रक्कम एका वर्षासाठी आहे. अधिक माहिती आणि अर्ज करण्याकरीता इच्छुकांनी खालील कार्यालयाशी संपर्क साधावा.

वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई २. अधीक्षक, सिंह विहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई

ईमेल : lionsafaripark@gmail.com

मोबाइल नं : ७०२०२८२७१४

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत