Electric vehicles will be promoted and given priority - Deputy Chief Minister Ajit Pawar
तंत्रज्ञान पुणे महाराष्ट्र

इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : राज्यातील वाढते प्रदूषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक‍ गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. फिटवेल मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांसाठीच्या इलेक्ट्रिक थ्री-व्हिलर गाड्यांच्या वितरण सेवेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड येथे झाले. त्यावेळी […]

Abortion pill: method of use, advantages and disadvantages
तब्येत पाणी ब्लॉग लाइफ स्टाइल

गर्भपाताच्या गोळ्या घेताय? जाणून घ्या वापर, फायदे, तोटे आणि गर्भपाताशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे…

अनियोजित गर्भधारणा झाल्यास प्रत्येक स्त्रीच्या मनात अनेक प्रश्न उद्भवतात. जसे की यावेळी गर्भपाताची गोळी घेणे सुरक्षित आहे का? किंवा त्यांना मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (MTP) करण्याची आवश्यकता आहे? गर्भपाताच्या गोळीचे साइड इफेक्ट्स काय आहेत? खरं तर, गर्भपात करण्याच्या सर्व पर्यायांबद्दल आणि त्याबद्दलच्या कायद्याबद्दल आपल्या देशातील महिलांमध्ये फारच कमी जागरूकता आहे. आपण जर अनियोजित गर्भधारणेबद्दल विचार […]

14 cases registered in the state for illegal sale of drugs used for abortion, 11 arrested
महाराष्ट्र मुंबई

गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल, 11 जणांना अटक

मुंबई : गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधाची खरेदी विक्री करणारे ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण राज्यभर 26 जून ते 9 जुलै या कालावधीत तपासणी व धाडीची धडक मोहीम राबवून एकूण 348 ठिकाणी तपासणी केली. यात 14 गुन्ह्यांची नोंद झाली असून […]

What exactly are the 'Red', 'Orange', 'Green' and 'Yellow' alerts issued by the Meteorological Department
महाराष्ट्र

महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज, तर ‘या’ पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून रायगड आणि पुण्यासह राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने बुधवार ते शुक्रवार दरम्यान मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे, […]

11-year-old dies of bird flu in India
देश

भारतात बर्ड फ्लुमुळे पहिला मृत्यू, 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नवी दिल्ली : बर्ड फ्लुमुळे देशातील पहिला मृत्यू झाला आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात एविएन इन्फ्लुएन्जा H5N1 म्हणजेच बर्ड फ्लूची लागण झालेल्या 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील नर्स आणि डॉक्टरांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. एम्स रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 11 वर्षांच्या या मुलाला 2 जुलै रोजी एम्समध्ये दाखल करण्यात […]

Shilpa Shettys husband Raj Kundra arrested for making pornographic films
देश

अश्लील चित्रपट बनविण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा यांच्यासह 11 जणांना अटक, पोलिसांकडे ठोस पुरावे

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट बनविण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने आतापर्यंत अश्लील फिल्म बनविण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा यांच्यासह एकूण 11 जणांना अटक केली आहे. व्यावसायिक राज कुंद्रा मंगळवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत हजर झाल्यानंतर त्याला ‘अश्लील चित्रपट बनविणे आणि ते […]

What is Zika virus? Learn about preventive measures, symptoms, diagnosis and treatment
तब्येत पाणी ब्लॉग लाइफ स्टाइल

झिका आजार काय आहे? जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, लक्षणे, निदान व उपचार…

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार असून तो १९४७ साली युगांडा देशातील काही माकडांमध्ये आढळला होता. त्यानंतर १९५२ साली युगांडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फ्लॅव्ही व्हायरस प्रजातीचा असून तो एडिस डासांमार्फत पसरतो. सध्या केरळमध्ये झिकाचे १३ रुग्ण आढळुन आले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सावधानता बाळगणे आवश्यक […]

The country will be self-reliant if everyone contributes more to the society - Governor Bhagat Singh Koshyari
महाराष्ट्र मुंबई

प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिल्यास देश आत्मनिर्भर होईल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीने योगदान देत असतात. मात्र, सर्वांना आरोग्य सेवा व शिक्षण उपलब्ध करून, तसेच गरिबी हटवून देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ३१ निवडक व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन […]

Chief Minister Uddhav Thackeray in Pandharpur
महाराष्ट्र सोलापूर

पंढरपुरात पुन्हा भक्तिसागर भरु दे, जनतेला आरोग्य लाभू दे, मुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाच्या चरणी साकडे

पंढरपूर : पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरु दे. भक्तिरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशी महापूजेच्या वेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा […]

Debris fell on house after landslide in Thane, 5 people including 3 children died
ठाणे महाराष्ट्र

ठाण्यात घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना, ३ मुलांसह 5 जणांचा मृत्यू

ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व इथे डोंगर परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात घरांवर दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. या […]