Shilpa Shettys husband Raj Kundra arrested for making pornographic films

अश्लील चित्रपट बनविण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा यांच्यासह 11 जणांना अटक, पोलिसांकडे ठोस पुरावे

देश

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट बनविण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने आतापर्यंत अश्लील फिल्म बनविण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा यांच्यासह एकूण 11 जणांना अटक केली आहे. व्यावसायिक राज कुंद्रा मंगळवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत हजर झाल्यानंतर त्याला ‘अश्लील चित्रपट बनविणे आणि ते काही अ‍ॅप्सद्वारे प्रकाशित करणे’ या प्रकरणात अटक करण्यात आली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्राला मंगळवारी पहाटे जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. नंतर त्याला मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयात नेण्यात आले. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी सांगितले कि, “या प्रकरणात राज कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याचे दिसते. आमच्याकडे याबाबत पुरेसे पुरावे आहेत.” नागराळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “राज कुंद्रा हा मुख्य सूत्रधार असल्याचे दिसून येत असल्याने 19 जुलै 2021 रोजी आम्ही या प्रकरणात त्याला अटक केली आहे. आमच्याकडे या संदर्भात पुरेसे पुरावे आहेत. चौकशी सुरू आहे.”

फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबईतील गुन्हे शाखेमध्ये अश्लील चित्रपट बनविण्याबद्दल आणि काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रकाशित केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिने राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदारांवर आपल्या फोटोंचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. मात्र, राज कुंद्रा यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. परंतु, यावेळी हे प्रकरण गंभीर असल्याचे दिसत आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की राज कुंद्राविरोधात त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत