11-year-old dies of bird flu in India

भारतात बर्ड फ्लुमुळे पहिला मृत्यू, 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

देश

नवी दिल्ली : बर्ड फ्लुमुळे देशातील पहिला मृत्यू झाला आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात एविएन इन्फ्लुएन्जा H5N1 म्हणजेच बर्ड फ्लूची लागण झालेल्या 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील नर्स आणि डॉक्टरांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एम्स रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 11 वर्षांच्या या मुलाला 2 जुलै रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या मुलाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचं निष्पन्न झाले होते. मृत मुलगा हरियाणामधील असल्याची माहिती मिळाली असून एनसीडीसीच्या एका पथकाला या गावात पाठवण्यात आले आहे. या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी देशातील अनेक राज्यांत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी कोंबड्या ठार करण्यात आल्या होत्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत