What exactly are the 'Red', 'Orange', 'Green' and 'Yellow' alerts issued by the Meteorological Department
महाराष्ट्र

महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज, तर ‘या’ पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून रायगड आणि पुण्यासह राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हवामान खात्याने बुधवार ते शुक्रवार दरम्यान मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, पुणे आणि कोल्हापूरातील घाट माथ्यावर मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत