गृहमंत्रालयाने बुधवारी कोरोनासंदर्भात नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सरकारने सांगितले की, आता अधिक आसनक्षमता असणारी सिनेमा हॉल आणि थिएटर्स उघडली जातील. पूर्वी ते फक्त 50% क्षमतेसह उघडता येऊ शकत होते. याशिवाय आता सर्वांना जलतरण तलावात जाण्याची परवानगी असेल. यापूर्वी केवळ खेळाडूंना त्याचा वापर करण्याची परवानगी होती.
गाईडलाईन्सचे महत्त्वपूर्ण मुद्दे :
- सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकार मास्क आणि सोशल डिस्टंसिंगसह सर्व आवश्यक नियमांचे पालन करण्याचा निर्णय घेतील.
- जिल्हा अधिकारी आवश्यकतेनुसार कंटेन्ट झोन ठरवू शकतील, परंतु त्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशांकडे लक्ष द्यावे लागेल.
- कंटेनमेंट झोनमधील सर्व उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा, पोलिस आणि पालिका अधिकारी जबाबदार असतील.
- राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकार यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या उत्तरदायित्वाचा निर्णय घेतील.
- आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाबद्दल गृह मंत्रालयाच्या सल्ल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालय निर्णय घेईल.
- 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोक, गर्भवती महिला आणि 10 वर्षांखालील मुलांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
- प्रवासी गाड्या, शाळा, हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससारख्या अनेक हालचालींसाठी SOP आधीच जारी करण्यात आल्या आहेत. त्यांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
- कंटेनमेंट झोनच्या बाहेर, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या SOP नुसार सामाजिक, रीलिजस, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक मेळाव्यास अनुमती दिली जाईल.
- आता सर्व प्रकारचे प्रदर्शन हॉल उघडण्यात येतील. यासाठी वाणिज्य विभाग SOP जारी करेल.
- आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी नागरी उड्डाण मंत्रालय परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेऊ शकेल. यासाठी गृहमंत्रालयाकडून पहिला सल्ला घ्यावा लागेल.
- आतापर्यंत गाड्या, हवाई प्रवास, मेट्रो ट्रेन, शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे, हॉटेल, शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स, पार्क्स, योग वर्ग आणि जिमसाठी वेळोवेळी SOP देण्यात आल्या आहेत. त्यांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.




