मुंबई : साहित्यातून, पत्रकारितेतून सामाजिक कार्याचा डोंगर उभा करता येतो, याचे आदर्श उदाहरण ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी घालून दिले. सेवाव्रत सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी साहित्यिक आणि हाडाचा पत्रकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आपल्यातून निघून जाणे क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
संतापजनक! प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महिलेचे अपहरण करून सामूहिक बलात्कार
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित महिला आणि आरोपींमध्ये पूर्ववैमनस्य होतं, त्यातूनच ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे लग्न झाले असून […]
दुःखद! ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन
पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालं आहे. आज (२७ जानेवारी) सकाळी सुमारे ९.१५ वाजताच्या सुमारास सुप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट ह्यांचे दीर्घ आजाराने पुण्यातील पत्रकारनगर येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. अनिल अवचट यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व विविध प्रकारच्या कामांतून दिसून येते. मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या […]
मोठी बातमी! तब्बल ७ कोटींच्या बनावट नोटा जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई, टोळीचा पर्दाफाश
मुंबई : मुंबईत भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापून वितरीत करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका आंतरराज्यीय टोळीला आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. या टोळीकडून सात कोटी रुपये, ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन्स, एक लॅपटॉप आणि काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहे. दहिसर परिसरात या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई शहरात बनावट चलनी नोटा छापून त्या दैनंदिन व्यवहारात […]
Budget 2022 : देशाचा यंदाचा अर्थसंकल्पही डिजिटल स्वरुपात; फक्त इतक्याच प्रतींची छपाई
Budget २०२२ : १ फेब्रुवारी रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. परंतु, मोदी सरकारचं यंदाच बजेटही डिजिटल स्वरुपात असणार आहे. केंद्र सरकारनं याबाबत माहिती दिली आहे. देशभरात पसरलेल्या साथीच्या आजारामुळे, आशियातील तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे कर प्रस्ताव आणि आर्थिक स्टेटमेंट्सच्या सादरीकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रं छापली जाणार नाहीत, म्हणजेच यावेळीही भारतीयांना बजेट फक्त डिजिटल स्वरूपात […]
पत्नीला चौथ्या मजल्यावरून इमारतीच्या लिफ्ट डक्टमध्ये ढकलले, घरगुती वादातून भयंकर कृत्य
पुणे : पुण्यात एका २५ वर्षीय महिलेला तिच्या पतीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लिफ्टच्या उघड्या डक्टमध्ये ढकलून दिल्याची घटना घडली. यामध्ये महिलेच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे. घरगुती वादातून महिलेच्या पतीने हे धक्कादायक कृत्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी रविवारी आरोपी पतीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक येथील काकडे वस्ती येथील […]
पुण्यात महिलेने नवऱ्याची केली गळा आवळून हत्या, बहिणीच्या नवऱ्याची घेतली मदत
पुणे : पुण्यात घरगुती वादातून महिलेने आपल्या नवऱ्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने बहिणीच्या पतीच्या मदतीने स्वतःचा पती कॅप्टन सिंग नायक (३७) यांची गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी त्यांची पत्नी अंजली कप्तानसिंग नायक (३२) आणि गजेंद्र चित्तरसिंग नायक (३६) या दोघांनाही अटक केली आहे. गजेंद्र चित्तरसिंग नायक (३६) आणि अंजली कप्तानसिंग […]
राज्यात थंडीची लाट, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
मुंबई : राज्यात सध्या चांगलीच थंडी जाणवत आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पुढील ४८ तासांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवस राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून याबाबत इशारा देण्यात आला आहे. पुढील ४८ तासांसाठी प्रादेशिक हवामान केंद्र […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला कोरोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, अशी माहिती शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. शरद पवार यांनी ट्विट करत सांगितले कि, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या […]
इंडियन आर्मी : 12वी पास उमेदवारांसाठी निघाली भरती, 24 जानेवारीपासून अर्ज करता येणार..
इंडियन आर्मी : भारतीय सेना तांत्रिक प्रवेश योजना (TES) 10+2 प्रवेश 46 अभ्यासक्रमांसाठी भरती करत आहे. अधिसूचनेनुसार, भारतीय सेना TES 47 ऑनलाइन अर्ज लिंक 24 जानेवारी 2022 पासून सक्रिय होईल. इच्छुक उमेदवार 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत किंवा त्यापूर्वी joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. पात्रता बारावीत किमान ६०% गुणांसह विज्ञान विषयात (गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र) […]









