Counterfeit notes
अर्थकारण देश महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! तब्बल ७ कोटींच्या बनावट नोटा जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई, टोळीचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईत भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापून वितरीत करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका आंतरराज्यीय टोळीला आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. या टोळीकडून सात कोटी रुपये, ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन्स, एक लॅपटॉप आणि काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहे. दहिसर परिसरात या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबई शहरात बनावट चलनी नोटा छापून त्या दैनंदिन व्यवहारात आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आपल्या गोपनीय बातमीदारामार्फत या प्रकाराची संपूर्ण माहिती काढली. चार व्यक्ती २००० रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी दहिसरमध्ये येणार असल्याचं पोलिसांना कळलं. त्याप्रमाणे माहिती मिळालेल्या गाडीची झडती घेतली असता या गाडीमध्ये २००० रुपयांच्या नोटांचे २५० बंडल आढळून आले. २००० रुपयांच्या एकूण २५ हजार नोटा असे एकूण पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यानंतर सविस्तर कारवाई करून, आरोपींची झडती घेतल्यानंतर पोलिसांना ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन्स, एक लॅपटॉप, आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र आणि २८,१७० रोख रक्कम सापडली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत