Important instructions issued by WHO regarding the use of face masks
पुणे महाराष्ट्र

राज्यातील मास्क वापरण्याची सक्ती उठवण्यात येणार, हे वृत्त धादांत खोटं…

पुणे : राज्यातील मास्क वापरण्याची सक्ती उठवण्यात येणार, अशी चर्चा सुरु झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. हे वृत्त धादांत खोटे आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क लावायचा नाही, यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते शनिवारी पु्ण्यात पत्रकारपरिषदेत बोलत होते. त्यामुळे या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला आहे. अजित पवार […]

How Dolo-650 became the go-to fever drug during the pandemic
कोरोना देश

कोरोनाच्या संसर्गादरम्यान डोलो-650 चा वापर कसा वाढला? जाणून घ्या…

पुणे : सहज उपलब्धता आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान डॉक्टरांचे प्राधान्यकृत प्रिस्क्रिप्शन या कारणांमुळे डोलो-650 या पॅरासिटामॉलच्या ब्रँडच्या विक्रीत वाढ झाली आहेत. पॅरासिटामॉलच्या सर्व ब्रँडच्या विक्रीत निश्चितपणे वाढ झाली आहे, कारण कोविड -19 चा संसर्ग झालेल्या जवळजवळ प्रत्येकासाठी हे तापासाठी सर्वात सुरक्षित औषध आहे. मार्केट रिसर्च फर्म AIOCD-AWACS ने दिलेल्या माहितीनुसार, 2020 च्या दुसर्‍या तिमाहीत आणि […]

virus of covid 19 can be on smartphone tricks to sanitize and keep yourself safe
गॅझेट्स तंत्रज्ञान

स्मार्टफोनद्वारे घरी येऊ शकतात कोरोना विषाणू, जाणून घ्या फोन सॅनिटाइज करण्याची योग्य पद्धत…

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. या महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, आता हळूहळू सर्वजण यातून सावरत आहेत. मात्र, अजूनही कोरोना संसर्गाचा धोका कमी झालेला नाही. अशा परिस्थितीत अनेक महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडताना आपण आपला स्मार्टफोन नक्कीच सोबत घेऊन जातो. मात्र, कोरोना व्हायरस आपल्या फोनवरही येऊ शकतो. अशा […]

Beating Retreat Ceremony 2022 1000 drones will be showcased for the first time know live streaming
देश

आज बीटिंग रिट्रीट सोहळ्यात 1,000 ड्रोनसह होणार ड्रोन शो, कसा पाहता येणार जाणून घ्या…

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विजय चौकात आज संध्याकाळी बीटिंग रिट्रीट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा कार्यक्रम अनेक अर्थांनी खूप वेगळा असणार आहे. शनिवारी बीटिंग रिट्रीट सोहळ्यात (Beating Retreat Ceremony २०२२) देशी बनावटीचे 1,000 ड्रोन प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित केलेला 10 मिनिटांचा ड्रोन शो, स्टार्टअप बोटलॅब […]

how you to keep good health in winter season
देश महाराष्ट्र मुंबई

‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी, थंडीची लाट कायम…

नवी दिल्ली : जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे. उत्तर भारतात, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे तापमानात घट झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने मध्य आणि पश्चिम भारतासाठी नवीन अलर्ट जारी केला आहे. आजपासून देशातील या भागात थंडीच्या लाटेचा नवा टप्पा सुरू होणार आहे. इथं केवळ तापमानात घट होणार नाही, तर २ ते […]

Maharashtra Assembly Monsoon Session: 12 Bjp Mlas Suspended For One Year
महाराष्ट्र

सर्वोच्च् न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं, भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द

नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा, अध्यक्षांना शिवीगाळ तसंच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत, 5 जुलै 2021 रोजी भाजपच्या बारा आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन […]

क्राईम

प्रेमविवाहानंतर पत्नीचा हुंड्यासाठी छळ, शीर धडावेगळं करत निर्घृण हत्या आणि…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. हुंड्यासाठी पतीने आपल्या २४ वर्षीय पत्नीचा छळ केला, त्यानंतर तिची निर्घृण हत्या करून तिचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर महिलेच्या सासरच्या मंडळींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू आणि सासरा या तिघांना अटक करण्यात आली […]

fire
ठाणे महाराष्ट्र

ब्रेकिंग! भिवंडी परिसरातील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

ठाणे : ठाण्यातील भिवंडी परिसरातील समरस चामुंडा कॉम्प्लेक्समधील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भिवंडी अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Balabharati is changing with the changing times with the help of new technology
पुणे महाराष्ट्र

बालभारतीचा ५५ वा वर्धापन दिन, नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारतीही बदलत आहे

पुणे : बालभारतीचे आजवरचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून बदलत्या काळासोबत नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारतीही बदलत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा बालभारतीच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले. बालभारतीच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

27 जानेवारी 2021 : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० धोरण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात स्थापन केलेल्या डॉ. रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आज सादर करण्यात आला. त्यावर या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने स्थापन करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री […]