भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी सोडून गेल्यामुळे दुःखी झालेल्या एका तरुणाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या तरुणाने या घटनेच्या एक दिवस आधी चाकूने हाताची नस कापतानाचा एक व्हिडिओ बनवला होता आणि सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने स्वतःला जिवंत पेटवून घेतले. मिळालेल्या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मोठी बातमी! राज ठाकरेंच्या सभेनंतर पुण्यातील मनसेच्या महाआरतीचा निर्णय स्थगित
पुणे : पुण्यातील मनसेच्या महाआरतीच्या आयोजनाला स्थगिती देण्यात आली आहे. खरंतर, मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीतर मनसेच्या प्रत्येक शाखेमध्ये हनुमान चालीसा लावून महाआरती करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला होता. पण उद्या रमजान ईद आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर स्थानिक पातळीवर महाआरतीचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. मनसेच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती मिळाली […]
नवनीत राणा यांनी पत्र लिहून केली तात्काळ उपचारांची मागणी, जामिनावर आज होणार सुनावणी…
मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणप्रकरणी कोठडीत असणाऱ्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालय याबाबत निकाल देणार आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, नवनीत राणा यांच्या […]
कोणालाही लसीकरण करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : केंद्राचे सध्याचे लसीकरण धोरण अनियंत्रित नसल्याचे सांगून, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय दिला की कोणत्याही व्यक्तीला लसीकरण करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणि बीआर गवई यांच्या खंडपीठाने सांगितले की उपलब्ध सामग्रीच्या आधारे आणि गंभीर रोग, रुग्णालयात दाखल रुग्ण इत्यादींवरील तज्ञांचे मत लक्षात घेता, सध्याचे लस धोरण अवास्तव आहे, […]
संतापजनक! पती आणि मुलांच्या डोळ्यादेखत महिलेवर सामूहिक बलात्कार, महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेश येथे सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानकावर पती आणि मुलांच्या डोळ्यादेखत महिलेवर सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे. प्रकाशम जिल्ह्यातील यारागोंडा भागातील एक महिला तिच्या पती आणि मुलांसह रात्री 11.30 वाजता रेपल्ले रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरली होती. मध्यरात्र असल्यामुळे त्यांना नागाईलंकाला जाण्यासाठी एकही बस मिळू शकली नाही, त्यामुळे […]
पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार, केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या ‘या’ महत्वपूर्ण सूचना
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने सर्वांना हैराण केले आहे. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. यात उष्णतेशी संबंधित आजारांवरील राष्ट्रीय कृती आराखड्याचा सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रसार करण्याचे आवाहन केले. […]
सर्व स्पून फीडिंग शक्य नाही.. धोनीनं सांगितलं जडेजाने कॅप्टनशिप सोडण्याचे कारण…
मुंबई : महेंद्रसिंह धोनी पुन्हा कॅप्टन होताच पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं विजय मिळवला आहे. रविवारी पुण्यात झालेल्या लढतीमध्ये सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा 13 रननं पराभव केला. हा आयपीएल सिझन सुरू होण्यापूर्वी रविंद्र जडेजाची चेन्नईच्या कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण, जडेजानं आठ मॅचमधील खराब कामगिरीनंतर कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद विरूद्ध विजय मिळाल्यानंतर धोनी म्हणाला, […]
भाजप नेते गणेश नाईकांवर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई, दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळला
मुंबई : भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. नेरुळ आणि सीबीडी पोलीस ठाण्यातील दोन्ही गुन्ह्यात त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर गणेश नाईक आज हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयानं गणेश […]
संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाच्या नूतनीकरण कामाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
मुंबई : संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नूतनीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार झालेल्या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. आज पाहणी केल्यानंतर या प्रदर्शनाबाबत सर्वसामान्यांना तसेच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यादृष्टीने येथे लेझर शोच्या माध्यमातून माहिती दिली जावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री […]
चारधाम यात्रेसाठी यात्रेकरूंच्या संख्येवर दैनंदिन मर्यादा निश्चित, जाणून घ्या…
3 मे पासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेच्या आधी, उत्तराखंड सरकारने यात्रेकरूंच्या संख्येवर दैनंदिन मर्यादा निश्चित केली आहे. या निर्णयानंतर बद्रीनाथमध्ये दररोज केवळ १५ हजार, केदारनाथमध्ये १२ हजार, गंगोत्रीमध्ये ७ हजार आणि यमुनोत्रीमध्ये ४ हजार यात्रेकरूच दर्शन घेऊ शकतील. ही व्यवस्था ४५ दिवसांसाठी करण्यात आली आहे. याशिवाय यावेळी प्रवासासाठी प्रवाशांना कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे […]










