court order
महाराष्ट्र मुंबई

वृत्तपत्रांमध्ये देव-देवतांची छायाचित्रे छापण्यास मनाई करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : वृत्तपत्रांमध्ये देव-देवतांचे फोटो छापण्यावर निर्बंध घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती व्हीजी बिश्त यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालय असे निर्देश देऊ शकत नाही, असे नमूद केले. सर्वोच्च न्यायालयानेही कायदा बनवणे किंवा राज्याला कायदा करण्याचे निर्देश देणे हे उच्च न्यायालयांचे काम नाही, असे नमूद […]

Harshda Garud of Pune won a gold medal in weightlifting
पुणे महाराष्ट्र

पुण्याच्या हर्षदा गरुडने वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक, “महाराष्ट्र कन्ये”चे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळमधील हर्षदाने ग्रीस- हेरॅक्लिओन येथील स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. हर्षदा शरद गरुड हिने ग्रीसमधील हेरॅक्लिओन येथे IWF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय बनण्याचा इतिहास रचला. […]

mns chief raj thakre
महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

मुंबई : सांगलीतील शिराळा येथील न्यायालयाने 6 एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात 2008 च्या आयपीसी 143, 109, 117, 7 मधील फौजदारी दुरुस्ती आणि 135 मधील खटल्याच्या संदर्भात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. एका जुन्या प्रकरणात हे वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती आहे. ६ एप्रिल रोजी हे वॉरंट जारी करूनही अद्याप राज यांच्यावर […]

food and drug administration
महाराष्ट्र मुंबई

गर्भपाताच्या औषधाची ऑनलाईन विक्री करणाऱ्या amazon विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुंबई : इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टलवर गर्भपातासाठी वापरात येणारी औषधे नियमबाह्य पद्धतीने विक्री होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. या ऑनलाईन विक्रीची पडताळणी करण्यासाठी विविध ऑनलाईन विक्री पोर्टल्स वर विनाप्रिस्क्रीप्शन MTP kit या औषधाची मागणी नोंदविण्यात आली होती. ॲमेझॉन (amazon.in) या ऑनलाईन पोर्टल वर A-Kare या ब्रँड नावाने गर्भपाताचे औषध उपलब्ध असल्याचे आढळून आले होते. […]

Crude oil prices rise, petrol-diesel prices rise Learn new rates.
अर्थकारण देश

कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेलचे दरही वाढले जाणून घ्या नवे दर.

मुंबई  : आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड पुन्हा एकदा प्रति बॅरल 108 डॉलरच्या वर गेले आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. मंगळवारीही कंपन्यांनी दरात बदल केलेला नाही. तेल कंपन्यांनी 6 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटची वाढ केली होती. त्यानंतर जवळपास […]

Minister Dhananjay Munde
बीड महाराष्ट्र राजकारण

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वाचवले अपघातग्रस्त तरुणाचे प्राण..

परळी : बीड येथील शासकीय बैठका आटोपून परत परळीला येत असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणाचे प्राण वाचवण्यास मदत केली आहे. बीड वरून परळी कडे जात असताना सिरसाळा ते पांगरी दरम्यान एक तरुण दुचाकीस्वार अपघात ग्रस्त होऊन रस्त्यावर अक्षरश: रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, हे दृश्य पाहताच धनंजय मुंडे […]

At least 25 died due to heatstroke in Maharashtra; highest in 6 years
महाराष्ट्र मुंबई

राज्यात किमान 25 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू, सहा वर्षांतील सर्वाधिक आकडेवारी

मुंबई : महाराष्ट्रात 2022 मध्ये आतापर्यंत किमान 25 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे, जो सहा वर्षांतील सर्वाधिक असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. याआधी 2016 मध्ये उष्माघाताने 19 जणांचा मृत्यू झाला होता. 1 मे 2022 पर्यंत उष्माघाताची एकूण 381 प्रकरणे आरोग्य विभागाकडे नोंदवण्यात आली आहेत. उष्माघातामुळे सर्वाधिक 11 मृत्यू नागपुरात, त्याखालोखाल औरंगाबादमध्ये 5 आणि […]

Akshaya tritiya things you must know before buying gold coins
अर्थकारण ट्रेडिंग

अक्षय्य तृतीयेला सोन्याची नाणी खरेदी करण्याचा विचार करताय? मग लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

पुणे : अनेकांना सोन्यात गुंतवणूक करायला आवडते आणि दिवाळी, धनत्रयोदशी आणि अक्षय्य तृतीया यांसारख्या प्रसंगी तर ते आवर्जून खरेदी करतात. यावर्षी अक्षय्य तृतीया 3 मे रोजी आहे आणि बरेच लोक सोने खरेदी करण्याचा विचार करत असतील. वास्तविक, अक्षय्य तृतीया हा सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. या प्रसंगी सोने खरेदी करणे सौभाग्य आणि समृद्धीशी संबंधित […]

Leaving work and combing your hair is a serious form of abuse
महाराष्ट्र मुंबई

स्वतःच्या मावशीची चाकूने 54 वार करून हत्या करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा

मुंबई : 2010 मध्ये आपल्या मावशीची चाकूने 54 वार करून हत्या करणाऱ्या 33 वर्षीय व्यक्तीला सत्र न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच पुष्टी दिली. न्यायमूर्ती पीबी वराळे आणि न्यायमूर्ती एन.आर.बोरकर यांच्या खंडपीठाने निकाल दिला की, ट्रायल कोर्टाने रेकॉर्डवरील पुराव्याच्या आधारे कथित गुन्ह्यासाठी आरोपींना दोषी ठरवणे योग्य आहे. खंडपीठाने फिर्यादीचा खटला संशयास्पद असल्याचा युक्तिवाद […]

Postponement of MNS Maha Aarti in Pune
महाराष्ट्र मुंबई

मनसेकडून संपूर्ण राज्यभरात होणारी महाआरती रद्द, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना केलं ‘हे’ आवाहन

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर आता मनसेकडून संपूर्ण राज्यभरात होणारी महाआरती रद्द करण्यात आली आहे. उद्या रमजान ईद आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी राज्यभर होणाऱ्या महाआरतीचा निर्णयाला स्थगिती देत आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले की, “उद्या ईद आहे, मुस्लिम बांधवांचा हा सण आनंदाने साजरा व्हावा, […]