Harshda Garud of Pune won a gold medal in weightlifting
पुणे महाराष्ट्र

पुण्याच्या हर्षदा गरुडने वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक, “महाराष्ट्र कन्ये”चे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळमधील हर्षदाने ग्रीस- हेरॅक्लिओन येथील स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हर्षदा शरद गरुड हिने ग्रीसमधील हेरॅक्लिओन येथे IWF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय बनण्याचा इतिहास रचला. तिने 45 किलो वजनी गटात 153 किलो वजन उचलले, ज्यामध्ये स्नॅचमध्ये 70 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 83 किलो वजनाचा समावेश होता.

या स्पर्धेत भारताने यापुर्वी असे सुवर्णपदक जिंकले नव्हते. त्यामुळे हर्षदाने भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल, अशी कामगिरी केली आहे. “महाराष्ट्र कन्ये”चा हा पराक्रम आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी हर्षदाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत