नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आता देशाला आणखी एका सुवर्णपदकाची आशा आहे. भारताला कुस्तीपटू विनेश फोगाटकडून सुवर्णपदकाची आशा आहे. विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठून इतिहास रचला आहे. यानंतर विनेश फोगाट म्हणाली कि, हा फक्त एक मैलाचा दगड आहे, अजून ध्येय गाठायचे आहे. विनेश फोगाटने अंतिम फेरीत मजल मारल्यानंतर आपल्या आईला व्हिडिओ कॉल केला […]
टॅग: gold medal
जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये, राज्य मंत्रिमंडळाकडून अभिनंदन
मुंबई : जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना रोख २ कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केले असून राज्य मंत्रिमंडळानेही त्याच्या अभिनंदनाचा ठराव केला. कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत […]
पीव्ही सिंधूने मिळवले सुवर्णपदक, राष्ट्रकुल स्पर्धेत दमदार कामगिरी
बर्मिंगहम : भारताची अव्वल बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले. यापूर्वी सिंधूने २०१४ साली राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते, तर २०१८ साली रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यामुळे तिचे हे राष्ट्रकुलमधील पहिले सुवर्णपदक होते. या सामन्यात पहिला गेम सिंधूने २१-१५ असा जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तिने दमदार कामगिरी केली आणि जेतेपद पटकावले. सिंधूने […]
भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने जिंकलं सुवर्णपदक, राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी
बर्मिंगहम : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारताला कुस्तीमधील पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले. बजरंगने यावेळी अंतिम फेरीत ९-२ असा विजय साकारला आणि देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. भारताला कुस्तीमध्ये या स्पर्धेत मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता बजरंगने ६५ किलो फ्रीस्टाइल प्रकारात देशासाठी सहज सुवर्ण जिंकले. अंतिम सामन्यात बजरंगला कॅनडाच्या लचलान मॅकनिलाचे आव्हान होते. […]
पुण्याच्या हर्षदा गरुडने वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक, “महाराष्ट्र कन्ये”चे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळमधील हर्षदाने ग्रीस- हेरॅक्लिओन येथील स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. हर्षदा शरद गरुड हिने ग्रीसमधील हेरॅक्लिओन येथे IWF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय बनण्याचा इतिहास रचला. […]





