मुंबई : पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावरही १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांची दसरा मेळाव्यात सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे. पत्रा चाळ प्रकरण नेमकं काय? पत्राचाळ प्रकरणात बिल्डरने १०३४ कोटींची फसवणूक केल्याची तक्रार दाखल होती. २००८ मध्ये पत्राचा […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
जम्मू-काश्मीरचे DG जेल हेमंत लोहिया यांची राहत्या घरात निर्घृण हत्या, TRF दहशतवादी संघटनेचे कृत्य
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरचे डायरेक्टर जनरल ऑफ प्रिजन्स (DG जेल) हेमंत लोहिया यांची सोमवारी रात्री उशिरा त्यांच्याच घरात निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्यांचा नोकर यासिर याने ही घटना घडवून आणल्याची माहिती मिळाली आहे. जेलचे डीजी हेमंत लोहिया हे जम्मूच्या बाहेरील उदयवाडा येथे राहत […]
ठाण्यात खळबळ! घरगुती वादातून स्वतःची पत्नी आणि दोन मुलींना जिवंत जाळले, आग लागल्याचा केला बनाव, मात्र…
ठाणे : डोंबिवली येथे घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींना रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आरोपीही होरपळला गेला. दरम्यान, घटनेनंतर या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे आरोपीची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. मिळालेल्या […]
राज्यातील लम्पी बाधितांपैकी 50 टक्के पशुधन रोगमुक्त
मुंबई : राज्यामध्ये दि. 3 ऑक्टोबर 2022 अखेर 31 जिल्ह्यांमधील 2151 गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील 48,954 बाधित पशुधनापैकी 24,797 म्हणजे सुमारे 50 टक्के पशुधन रोगमुक्त झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले. सिंह यांनी सांगितले की, राज्यातील बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर 109.31 लाख लस […]
कुस्तीच्या सरावानंतर 23 वर्षाच्या पैलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पंढरपूर : तालमीत कुस्तीचा सराव करत असताना २३ वर्षाच्या पैलवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरच्या वाखरी येथील मारूती सुरवसे हा तरुण कोल्हापुरातील एका तालमीत सराव करत होता, त्यावेळी ही घटना घडली. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरवसे हा कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत होता. दरम्यान, रात्री तालमीत कुस्तीचा […]
डॉ. सोमनाथ गिते यांना ‘राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवादुत पुरस्कार २०२२’ प्रदान
संगमनेर : मागील १०-१२ वर्षांपासून व्यसनमुक्ती विषयावर सातत्याने लेखन करणारे डॉ. सोमनाथ गिते यांना २०२२ चा ‘व्यसनमुक्ती सेवादुत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. समुपदेशन, वर्तमानपत्रं, मासिकं, सोशल मीडिया आदी माध्यमांतून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य गिते यांनी केले आहे. या कार्याची दखल घेत शांताई प्रतिष्ठान संचलित स्वर्ग व्यसनमुक्ती केंद्राच्या तसेच सिद्धिविनायक हाॅस्पिटल यांच्या संयुक्त […]
राज्यभर 700 ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई : राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, राज्यभर सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणे, बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी […]
व्यसनमुक्तीची चळवळ गतिमान व्हावी – सहाय्यक आयुक्त एस. के. मिनगिरे
राणीसावरगाव, गंगाखेड (परभणी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शांताई प्रतिष्ठान संचलित स्वर्ग व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने सिद्धिविनायक हाॅस्पिटल, राणीसावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राज्यस्तरीय व्यसनमुक्ती शिबीर व राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवादुत पुरस्कार 2022 च्या वितरण सोहळ्याचे आयोजन डॉ. गजानन रेवणवार, डॉ. शुभांगी ग.रेवणवार व प्रकल्प समन्वयक विठ्ठल आचार्य यांनी केले. यावेळी या संमेलनाच्या […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हत्येची धमकी देणाऱ्या व्यक्तीस अटक, पोलिस यंत्रणा सतर्क
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या गृह विभागाने मुख्यमंत्र्यांविरोधातील सर्व धमक्यांची दखल घेतली आहे. “आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकडे आणि इतर बाबींवर पूर्ण लक्ष देत आहोत. काल मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला […]
‘ती’ कारवाई बिल्डर्सच्या सांगण्यावरून.., मुंबई उच्च न्यायालयाने BMC ची कानउघाडणी करत फेटाळली याचिका
मुंबई : मुंबई हायकोर्टाने अलीकडेच बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) बिल्डर्सच्या सांगण्यावरून कारवाई करण्याबाबत ताकीद दिली आहे की BMC ने दाखल केलेल्या याचिकांपैकी एक बिल्डरच्या फायद्यासाठी हलवली गेली आहे. न्यायमूर्ती जीएस पटेल आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने महापालिकेला बांधकाम व्यावसायिकांपासून अंतर राखण्यास सांगितले. बीएमसीच्या याचिकेत जीर्ण झालेल्या तात्पुरत्या संरचनेतून भाडेकरूंना बाहेर काढण्यास स्थगिती देणारा आदेश रद्द करण्याची […]










