State Level Addiction Sevaduta Award 2022 by Swarg Addiction Center

व्यसनमुक्तीची चळवळ गतिमान व्हावी – सहाय्यक आयुक्त एस. के. मिनगिरे

महाराष्ट्र व्यसनमुक्ती

राणीसावरगाव, गंगाखेड (परभणी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शांताई प्रतिष्ठान संचलित स्वर्ग व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने सिद्धिविनायक हाॅस्पिटल, राणीसावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राज्यस्तरीय व्यसनमुक्ती शिबीर व राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवादुत पुरस्कार 2022 च्या वितरण सोहळ्याचे आयोजन डॉ. गजानन रेवणवार, डॉ. शुभांगी ग.रेवणवार व प्रकल्प समन्वयक विठ्ठल आचार्य यांनी केले. यावेळी या संमेलनाच्या अध्यक्ष पदी समाज कल्याण विभागाचे स.आयुक्त एस.के.मिनगिरे हे होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

व्यसनमुक्तीची चळवळ गतिमान व्हावी – स.आयुक्त एस.के.मिनगिरे.यांचे प्रतिपादन..
व्यसनामुळे माणसांचे शारिरीक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक तसेच सामाजिक नुकसान होते आणि त्याचे परिणाम त्या व्यक्तीसह कुटुंबियांना व समाजाला भोगावे लागतात. त्यामुळे व्यसनामुळे वैयक्तिक पातळीवर तर नुकसान होतेच, पर्यायाने देशाच्या विकासावर देखील याचा परिणाम दिसुन येतो. म्हणुन व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात राज्यात प्रभावीपणे कार्य करणाऱ्या संस्था व सेवादुतांच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, व्यसनमुक्त होणे आता समाजाच्या हिताचे असून ही व्यसनमुक्तीची चळवळ आता गतिमान व्हावी, असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस.के.मीनगीरे यांनी कार्यक्रमात बोलताना केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यसनमुक्ती परिषदेचे प्रदेश सरचिटणीस व सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार विजेते प्रा अजिनाथ शेरकर, सहायक पोलिस निरीक्षक श्री. विक्रम हराळे, डॉ. व्यंकटेश दुब्बे, डॉ. गोविंद शिंदे, प्रसिद्ध व्याख्याते प्रा.सुभाष ढगे चाटोरीकर, सरपंच सौ.कल्पनाताई जाधव, चेअरमन नागेश जाधव, उपसरपंच गफार शेठ, जेष्ठ पत्रकार प्रकाश गळाकाटु आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बालाजी राम मोटे (गुंजेगाव), शिवाजी चव्हाण (राणीसावरगाव), डॉ.विजयकुमार राठोड (अंधोरी), डॉ.सुधीर चव्हाण (उजना), डॉ.नागनाथ देवकत्ते (ढाळेगाव), डॉ.विनोद गजघाटे (नागपुर), डॉ. सोमनाथ गिते (पुणे), कैलास गायकवाड (नांदेड), आधार बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान नांदेड, शांता संतोष मुरकुटे (किनगाव), रवी जयराम साबळे (परभणी), माहेश्वरी तादलापूरकर (नांदेड), डॉ.मनीष खंदारे (नांदेड), नीलाकांत जाधव (नाईकनगर), साबळे सुभाष , प्रल्हाद महाराज कांबळे (खंडाळी) यांना ‘व्यसनमुक्ती सेवादुत पुरस्कार २०२२’ देऊन सन्मानित करण्यात आले. नांदेडच्या “व्यसनमुक्ती एक संकल्प” या संस्थेच्या वतीने मोठे चित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. गजानन रेवणवार, डॉ. शुभांगी ग.रेवणवार व प्रकल्प समन्वयक विठ्ठल आचार्य यांच्या वतीने करण्यात आले होते. सुत्रसंचालन प्रा. शिवशंकर डोईजड यांनी केले तर प्रभाकर महाराज कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सोपान जाधव,चंद्रकांत कुलकर्णी व ईतरांनी परीश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत